शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आमिर खानच्या लेकीची हटके लग्न पत्रिका, व्हिडीओ पाहून सगळेच चक्रावले, नक्की काय आहे खास?

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 8, 2023 | 4:04 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
ira wedding card in puzzle style

ira wedding card in puzzle style

बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्ट म्हणजे अभिनेता आमिर खानची लेक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. इरा तिच्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर ३ जानेवारीला सात फेरे घेणार आहे. सध्या आमिरच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही बनवल्या गेल्या आहेत. पण इराने तिच्या मित्रपरिवारासाठी खास पत्रिका बनवत त्यांना लग्नासाठी आमंत्रण दिलं आहे. नुकतंच इराने त्यांच्या मित्रपरीवाराला पत्रिका पाठवल्या. त्या पत्रिकांमध्ये काहीतरी खास आहे. इराने तिच्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.सध्या तिच्या या निमंत्रण पत्रिकांची चांगलीच चर्चा रंगली आहे.(ira wedding card in puzzle style)

इरा-नुपूरच्या लग्नाची पत्रिका खास आहे. कारण, ही एक नुसती लग्नपत्रिका नसून एक कोडं आहे. जे कोडं पाहून तिचा मित्रपरिवार चक्रावून गेला आहे. तिने एक अटही सांगितली की जे कोणी हे कोडं सोडवेल तिच मैत्रीण तिची लग्नात करवली होणार. इराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तिने तिच्या मित्रपरिवाराच्या लग्न पत्रिका मिळाल्यानंतरच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड केल्या आहेत. हा व्हिडीओ खूप मजेशीरपणे चित्रीत केला आहे. हे कोडं सोडवताना आयराच्या मित्रांची बरीच बिकट अवस्था झालेली पाहायला मिळाली.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आणखी वाचा – “उपेंद्र लिमयेंना लोक का घाबरतात?”, प्रश्न विचारताच अभिनेत्याने सांगितलं सत्य, म्हणाले, “माझ्यापासून चार हात लांब…”

व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर करत इराने कॅप्शनमध्ये लिहीलं की, “एप्रिलपासून हे काम सुरु आहे. कधीच न करण्यापेक्षा उशीर चांगला. तसंच, आम्ही आता एका महिन्यात लग्न करणार आहोत. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही पाहू शकता की माझ्या आयुष्यात किती प्रकारची लोकं आहेत. पुर्ण व्हिडीओ पाहा आणि काहीही चुकवू नका”, असं सांगत तिने या व्हिडीओतील तिच्या मित्रपरिवाराच्या प्रतिक्रियांचं वर्णन केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आणखी वाचा – “त्याची लायकी नाही”, गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे सलमान खानबाबत धक्कादायक वक्तव्य म्हणाले, “पाकिस्तानसाठी प्रामाणिकपणा…”

इराची बहिण जैन मैरी खान लग्नाच्या पत्रिकेचं कोडं सोडवता सोडवता व्हिडीओत भावूक होताना दिसते. ती ते कोडं सोडवण्यासाठी कोणाचीही मदत घेण्यास नकार देते. ती हे पण सांगताना दिसते की या क्षणाला ती कधीच विसरू शकत नाही. इराने नोव्हेंबर २०२२ मध्ये नुपूर शिखरेबरोबर साखरपुडा केला. काही दिवसांपूर्वी इराने त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ते फोटो सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाले होते.

Tags: aamir khandaughter irawedding card
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding

सुरुची अडारकर व पियुष रानडेच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, रोमँटिक पोज दिली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.