‘बिग बॉस मराठी’ फेम या शो मधून घराघरात पोहोचलेले कलाकार म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ‘बिग बॉस’ या शोमध्ये असताना या कलाकारांची एकमेकांबरोबर मैत्री झाली आणि त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी शाही विवाह करत एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. दरम्यान या कलाकारांचे एकमेकांवर खूप प्रेम असल्याचे कायमच दिसून आले आहे. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर एकमकांबरोबरचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यांच्या या बातमीमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. प्रसाद-अमृताच्या लग्नसोहळ्याला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी उपस्थित राहून त्यांच्या सोहळ्याची रंगत वाढवली. त्यांच्या लग्नसमारंभाचे तसेच हळदीचे, संगीतचे अनेक फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Amruta Deshmukh On Instagram)
अमृता-प्रसाद ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यांचे काही खास फोटो, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. त्यांच्या लग्नाचे काही खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. संगीत, हळद, लग्न, त्यानंतर घरातील गृहप्रवेश, पूजा याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. लग्न, त्यानंतर त्यांची लग्नानंतरची पाहिलीची ‘मुव्हीडेट’ आणि नुकताच झालेला प्रसादचा वाढदिवस याचे खास क्षण त्यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले होते. अशातच अमृताने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या डिनरच्या मेन्यूचा खास फोटो शेअर केला आहे. प्रसादने अमृतासाठी एक स्पेशल डिश बनवत तिला खाऊ घालण्याचा बेत केला होता.
अमृताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका खास डिशचा फोटो शेअर केला आहे. यात फरसबी, मटार, फुलगोबी, गाजर, दही, मेयोनीज, उकडलेले अंडं यांपासून एक रेसिपी बनवली आहे. या रेसिपीचा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत ‘आरोग्यदायी जेवण’ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर हा फोटो शेअर करत तिने नवऱ्याला अर्थात प्रसादला “शेफ, कृपया हा फोटो शेअर करा” असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – Video : आमिर खानच्या लेकीची हटके लग्न पत्रिका, व्हिडीओ पाहून सगळेच चक्रावले, नक्की काय आहे खास?
दरम्यान, प्रसादनेही हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत त्या डिशची रेसिपी सांगितली आहे. प्रसाद हा उत्तम जेवण बनवतो हे तर सर्वांना माहितीच आहे. प्रसाद हा उत्तम जेवण बनवत असून त्याला जेवण बनवण्याची व ते खाऊ घालण्याची खूप आवड आहे असे अमृतानेही अनेकदा सांगितले आहे. त्यामुळे लग्नानंतर पुन्हा एकदा प्रसादने लाडक्या पत्नीसाठी म्हणजेच अमृतासाठी खास जेवणाचा बेट करत तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.