शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अशी चेष्ठा करताना…”, नवीन घर घेताच मयुरी वाघला पूर्वाश्रमीच्या पतीवरुन डिवचणाऱ्यांवर मंजिरी ओक भडकली, म्हणाली, “आनंदावर विरजण…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 9, 2023 | 10:36 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
manjiri oak got angry with news portals for spreading false headings about actress mayuiri wagh new home post viral on social media

"अशी चेष्ठा करताना...", नवीन घर घेताच मयुरी वाघला पूर्वाश्रमीच्या पतीवरुन डिवचणाऱ्यांवर मंजिरी ओक भडकली, म्हणाली, "आनंदावर विरजण... "

‘अस्मिता’ या मालिकेमुळे अभिनेत्री मयुरी वाघ घराघरांत लोकप्रिय झाली. यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तिने नुकतंच तिच्या स्वप्नातील नवीन घर खरेदी केलं असून गृहप्रवेश व वास्तुशांती पुजेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. “माझ्या स्वप्नांच्या यादीमधील आणखी एक गोष्ट मी पूर्ण करून दाखवली. माझं स्वप्न मी घराच्या रुपात साकार केलं” असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले. दरम्यान तिच्या या आनंदाच्या बातमीवर तिच्या चाहत्यांसह मराठीतील अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे तिचे अभिनंदन केले. (Manjiri Oak On Instagram)

मयुरीच्या नवीन घरानिमित्त तिला शुभेच्छा देणाऱ्या अनेक मॅसेजेस् व कमेंट्स चाहत्यांकडून करण्यात आले. अनेक मराठी न्यूज वेबपोर्टल्सकडूनही अभिनेत्रीचे कौतुक करण्यात आले. पण काही मराठी न्यूज वेबपोर्टलनी मयुरीच्या नवीन घराच्या बातमीला दिलेल्या हेडिंग्सवरुन आता नवीन विषयाला तोंड फुटले आहे. तिच्या नवीन घराची बातमी देताना काही वेबपोर्टल्सनी तिच्या आधीच्या लग्नावरुन तिला डिवचले आहे. दरम्यान, या सगळ्यात स्वतः मयुरीने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या सगळ्याचा मंजिरी ओक यांना चांगलाच संताप झाला आहे आणि तिच्या सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत तिने हा संताप व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : अभिषेक कुमारने जबरदस्ती खानजादीला किस करण्याचा केला प्रयत्न, गायिकेला राग अनावर, म्हणाली, “वाईट वागलास आणि…”

मंजिरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने मयुरीच्या घरासंदर्भात बातम्या केलेल्या न्यूजपोर्टलचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंखाली कॅप्शनमध्ये मंजिरीने असं लिहिलं आहे की, “एखादी मुलगी तिच्या आयुष्यात मेहनत करुन उभी राहते. नवीन घर घेते. तिचं कौतुक करायचं नसेल तर नका करु. पण बातमी देण्याची ही कुठली पद्धत आहे? म्हणजे एकीकडे ‘आपली’ अभिनेत्री म्हणायचं आणि ‘आपल्याच’ लोकांनी तिची अशी चेष्टा करायची का? हे छापताना आपण कोणाच्या तरी आनंदावर विरजण घालत असू किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबियांच्या दुःखाचं कारण होत असू? हा विचार एकदाही येत नसेल का? ‘अमुक अमुक व्यक्तीनी घर घेतलं’ इतक्या साध्या बातमीचा उगाच इतर गोष्टींबरोबर संबंध का लावायचा? की फक्त बातम्या वाचण्यासाठी काहीही हेडिंग्ज द्यायच्या? या आधीही अनेकदा असे प्रकार झाले आहेत. पण का कोणास ठाऊक आज व्यक्त व्हावंसं वाटलं.”

आणखी वाचा – “तुम्ही न डगमगता…”, दोन घटस्फोटांनंतर तिसरं लग्न केल्यानंतर पियुष रानडेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “माझ्या पाठिशी…”

दरम्यान, तिच्या या पोस्टला अनेक कलाकारांनी समर्थन दिले आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील, हेमांगी कवी, शर्मिष्ठा राऊत, नयना मुकये यांनी मंजिरीच्या पोस्टखाली कमेंट्स करत तिला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर अनेक नेटकऱ्यांनीही मंजिरीच्या या पोस्टला कमेंट करत पाठिंबा दिला आहे. अगदी खरं आहे, छान बोललीस, किती विचित्र बातमी आहे, तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत. एकदम बरोबर बोललात” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी मंजिरीला पाठिंबा दिला आहे.  

Tags: entertainmententertainment newsmanjiri oakmarathi actressmarathi entertainmentMarathi newsmayuri wagh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Amruta Phadke mom Wedding

'ठिपक्यांची रांगोळी' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने केलं दुसरं लग्न, फोटो पोस्ट करत म्हणाली, "हा निर्णय घ्यायला हिम्मत आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.