शनिवार, मे 24, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने केलं दुसरं लग्न, फोटो पोस्ट करत म्हणाली, “हा निर्णय घ्यायला हिम्मत आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 9, 2023 | 10:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Phadke mom Wedding

'ठिपक्यांची रांगोळी' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने केलं दुसरं लग्न, फोटो पोस्ट करत म्हणाली, "हा निर्णय घ्यायला हिम्मत आणि…"

सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला होता. सिद्धार्थने आईच्या दुसऱ्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरून देताच साऱ्यांनी त्याच्या या निर्णयाचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं. सिद्धार्थनंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीची आई दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली असल्याचं समोर आलं आहे. आईच्या दुसऱ्या इनिंगची पोस्ट अभिनेत्रीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. (Amruta Phadke mom Wedding)

‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अमृता फडके हिने नुकतीच तिच्या आईच्या लग्नाची आनंदाची बातमी शेअर केली आहे. अमृताने ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत ‘मानसी वहिनी’ अर्थात मानसी कानिटकर हे पात्र साकारलं होतं. मात्र काही कारणास्तव अभिनेत्रीने मालिकेचा निरोप घेतला. मात्र अमृता कायमच तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहिली. त्यानंतर आता अमृताच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमृताने आईच्या नव्या इनिंगचा फोटो शेअर करत ही बातमी चाहत्यांसह शेअर केली.

आणखी वाचा – सुरुची अडारकर व पियुष रानडेच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, रोमँटिक पोज दिली अन्…

आईच्या दुसऱ्या लग्नातील फोटो शेअर करत तिने आईसाठी व तिच्या बाबांसाठी खास पोस्ट लिहीत, “आई अभिनंदन. ८.१२.२०२३. तुझ्या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. उत्तम लाईफ पार्टनर मिळावा, असावा अशी सगळ्यांचीच मनापासून इच्छा असते. पण तस वाटणं, तसं मिळणं व घडणं हे प्रत्येकाच्या नशिबी असतंच असं नाही. पण आई तुला ही संधी देवाच्या कृपेने पुन्हा मिळत आहे. तेही तुझ्या 2nd inningच्या टप्प्यावर!” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Amrutaa Phadkke (@amrutaphadke_official)

पुढे तिने लिहिलं आहे की, “खूप वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारायला आणि ती जागा घ्यायला कोणीतरी असावं अशी मनापासून इच्छा होती. माझ्या आयुष्यात हा शब्द आणि मनात ती जागा करणं सोप्प नव्हतं, पण बाबा तू खरंच ती जागा भरून काढू शकतोस ही भावनाही माझ्यासाठी खूप सुखावणारी आहे. तुझ्यामुळे मला प्रेम करायला अजून एक गोड भाऊ आणि एक सुंदर बहीण मिळाली आहे. मनाने खूप श्रीमंत असलेल्या खूप मोठया कुटुंबाचा मी तुझ्यामुळे एक छोटासा भाग झाली आहे. खूप छान वाटतंय. मलाही खूप माणसांनी श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. त्यासाठी तुझी आभारी आहे” असं म्हणत आभार व्यक्त केले आहेत.

आणखी वाचा – “तुम्ही न डगमगता…”, दोन घटस्फोटांनंतर तिसरं लग्न केल्यानंतर पियुष रानडेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “माझ्या पाठिशी…”

यापुढे तिने, “आई, या वयात आणि या टप्प्यावर हा निर्णय घ्यायला खूप हिम्मत लागते. त्यासाठी खरंतर दोघांनाही सलाम. तुमची एकमेकांबरोबरची साथ-सोबत, तुमचा प्रेमाचा धागा अजून अजून पक्का होऊन घट्ट विणला जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना” असंही म्हटलं आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Tags: amruta phadkeamruta phadke actressamruta phadke mom weddingmarathi actressmarathi serialthipkyanchi rangoli
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Viral Video
Entertainment

Video : जंगलात योगा करत होती महिला, तोल जाताच नदीत वाहून गेली अन्…; नको तो स्टंट करणं जीवावर बेतलं

मे 23, 2025 | 7:00 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Women

हगवणे कुटुंबातील खरी व्हिलन नक्की करते तरी काय?, नणंदच दोन्ही भावजयांसाठी ठरली राक्षस

मे 23, 2025 | 6:56 pm
Navi mumbai Youth alive after heart attack
Lifestyle

गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका, १५ मिनिटं हृदय बंद, तरीही जिवंत असलेला ‘तो’ नक्की कोण?, काळ आला होता पण…

मे 23, 2025 | 6:40 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…

मे 23, 2025 | 6:04 pm
Next Post
Hemangi Kavi Answers To Trollers

"झिम्मा २ किती वेळा पाहिला?" हेमांगी कवीला नेटकऱ्याने डिवचताच दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, "आपण तुलना करण्यातच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.