बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुम्ही न डगमगता…”, दोन घटस्फोटांनंतर तिसरं लग्न केल्यानंतर पियुष रानडेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “माझ्या पाठिशी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 9, 2023 | 11:22 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding

"तुम्ही न डगमगता...", दोन घटस्फोटांनंतर तिसरं लग्न केल्यानंतर पियुष रानडेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "माझ्या पाठिशी..."

Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : अभिनेता पियुष रानडे व अभिनेत्री सुरुची अडारकरच्या लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. या जोडीची अचानक लग्नसोहळ्याची बातमी समोर आल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांनी त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याच्या या फोटोंवर कलाकार मंडळींसह त्यांच्या चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सुरुची व पियुषने अगदी थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पाडला. मेहंदी, हळदी समारंभाचे फोटोही त्यांचे समोर आले. तसेच दोघांच्या रिसेप्शनच्या लूकने अधिक लक्ष वेधून घेतलं होतं. सुरुची अडारकरचं हे पहिलंच लग्न आहे. तर पियुष हा तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. लग्नसोहळा उरकताच पियुषने त्याच्या या लग्नाबाबत पहिल्यांदाच भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत पियुषने त्याच्या लग्नाबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – सुरुची अडारकर व पियुष रानडेच्या हळदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, रोमँटिक पोज दिली अन्…

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????? N ???????????????????????????? (@suruchiadarkar)

लग्नसोहळ्याबाबत बोलताना पियुषने त्याच्या कुटुंबियांना प्राधान्य देत म्हटलं की, “आपल्या कुटुंबातील जवळचे सदस्य व मित्रपरिवार प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, तसेच ते तुम्हाला सर्वांशी संवाद साधण्याची परवानगी देतात. अगदी खात्रीशीर तुम्ही सांगू शकता की ते आपल्यासाठी आनंदी आहेत”. तर सुरुचीनेही तिच्या पहिल्या लग्नाबाबत व नवऱ्याबाबत पहिल्यांदा भाष्य केलं. तिच्या मनातील भावना तिने व्यक्त केल्या. ती म्हणाली, “मी खूप खूश आहे. माझा आनंद मी आता शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही. हा क्षण माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता”. पुढे ती, ““सगळ्या गोष्टी खासगी ठेवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणून आमच्या नात्याबाबतही मी कुठे समजू दिलं नाही” असंही म्हणाली.

आणखी वाचा – लग्नानंतर सुखाने संसार करत आहेत प्रसाद-अमृता, नवऱ्याने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, रेसिपीही सांगितली, म्हणाली, “वाटाणे, कोबी आणि…”

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????????? N ???????????????????????????? (@suruchiadarkar)

पियुषची याआधी दोन लग्न असफल ठरली आहेत. २०१० साली पियुष अभिनेत्री शाल्मली टोळ्येसह लग्नबंधनात अडकला. लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर ‘अस्मिता’ मालिकेदरम्यान त्याची ओळख मयुरी वाघसह झाली. आणि ते दोघे १ फेब्रुवारी २०१६ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांनतर त्याने मयुरीबरोबर घटस्फोट घेतला. दोन्ही लग्नात पियुषला असफलता मिळाली. त्यानंतर आता पियुष तिसऱ्यांदा सुरुची अडारकरसह लग्नबंधनात अडकला आहे.

Tags: entertainmentmarathi actorPiyush Ranadepiyush ranade marriagepiyush ranade weddingSuruchi AdarkarSuruchi Adarkar Piyush Ranade Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
bigg boss 17 abhishek kumar tried to kiss khanzaadi during task rapper said you should be punished

Bigg Boss 17 : अभिषेक कुमारने जबरदस्ती खानजादीला किस करण्याचा केला प्रयत्न, गायिकेला राग अनावर, म्हणाली, "वाईट वागलास आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.