शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“‘मोरुची मावशी’ सारखं नाटक करुनही…”, वडिलांना एकही पुरस्कार नसल्याची लेक वरद चव्हाणला खंत, म्हणाला, “दुर्देवी गोष्ट आहे की….”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 8, 2024 | 4:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Late actor Vijay Chavans son Varad regrets not getting any award for his famous play Moruchi Mavashi see the details

"'मोरुची मावशी' सारखं नाटक करुनही...", वडिलांना एकही पुरस्कार नसल्याची लेक वरद चव्हाणला खंत, म्हणाला, "दुर्देवी गोष्ट आहे की...."

ज्येष्ठ दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांनी त्यांच्या सशक्त अभिनयाने ४० वर्षे मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. ‘मोरुची मावशी’ या नाटकात विजय चव्हाण यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवले होते. हे त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यांत गाजलेले नाटक. १ जानेवारी १९८५ रोजी रंगमंचावर पहिल्यांदा सादर झालेल्या या नाटकाने त्यानंतर जवळपास अडीच हजार प्रयोगांचा पल्ला गाठला.

विजय चव्हाण यांचं ‘मोरुची मावशी’ हे नाटक म्हणजे तर रसिकांसाठी हास्याची मेजवानी होती.  आजही ‘मोरूची मावशी’ म्हटलं की, विजय चव्हाण यांचंच नाव अग्रक्रमाने येतं. ‘मोरूची मावशी’ हे संपूर्ण नाटक विजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देणारं आहे. ‘मोरुची मावशी’ म्हणजे विजय चव्हाण आणि विजय चव्हाण म्हणजे ‘मोरुची मावशी’ हे समीकरण जणू ठरलेलंचं. पण इतक्या लोकप्रिय व प्रसिद्ध नाटकासाठी विजय चव्हाण यांना एकही पारितोषिक मिळाला नाही.

‘मोरुची मावशी’ या नाटकाचे एकूण अडीच हजार प्रयोग पार पाडले. पण यातील ‘मोरुची मावशी’ला म्हणजेच अभिनेते विंजय चव्हाण यांना या नाटकासाठी एकही पारितोषिक मिळाला नसल्याची खंत त्यांचा मुलगा व अभिनेता वरद चव्हाणने व्यक्त केली आहे. नुकत्याच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या खास मुलाखतीच्या कार्यक्रमात वरदने या विषयीचे खंत व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी, ओटीटीवर पाहता येणार पाच वेगवेगळ्या सीरिज व चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

या मुलाखतीत त्यांनी खंत व्यक्त करत असं म्हटलं की, “मोरुची मावशी’सारख्या नाटकाचे २५ हजार प्रयोग झाले. पण इतकं हिट नाटक देऊनही त्या नाटकासाठी बाबांना (विजय चव्हाण) एकही पारितोषिक मिळालं नाही. त्याचबरोबर ‘दामोदर पंत’ या नाटकासाठीदेखील त्यांना एकही पारितोषिक मिळालं नव्हतं. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे.”

आणखी वाचा – “तब्येत सांभाळा नाहीतर…”, सूनबाईंवर जीवापाड प्रेम करतात मृणाल कुलकर्णी, फोटो पोस्ट करत म्हणाल्या, “मास्तरीन बाई…”

दरम्यान, ८ जानेवारी रोजी वरद व विजय चव्हाण यांचा दोघांचा वाढदिवस असतो. याचे औचित्य साधत वरदने ‘इट्स मज्जा’शी खास संवाद साधला. यावेळी वरदने विजय चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्याचा इंडस्ट्रीतील संघर्ष आणि त्याच्या अनुभवाचे कथनही केले.   

Tags: entertainment newsLate Actormarathi actormarathi entertainment newsMarathi newsVarad Chavanvijay chavanदिवंगत अभिनेतेमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीवरद चव्हाणविजय चव्हाण
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Sambhajiraje Chhatrapati

नागराज मंजुळेंच्या चित्रपटात संभाजीराजे छत्रपती साकारणार भूमिका, स्वतःच खुलासा करत म्हणाले, "फोन आला अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.