शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी, ओटीटीवर पाहता येणार पाच वेगवेगळ्या सीरिज व चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 8, 2024 | 12:51 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Hanuman Marvels Aarya 3 Bhakshak Guntur Karam Upcoming ott releases of this week 5 best movies and shows to watch see the details

या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी, ओटीटीवर पाहता येणार पाच वेगवेगळ्या सीरिज व चित्रपट, वाचा संपूर्ण यादी

येत्या दिवसांत ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी आहे. आगामी काही दिवसांत ओटीटीवर सस्पेन्स, थ्रीलर अन् क्राईमने परिपूर्ण चित्रपट व सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर जाणून घेऊयात, येत्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणारे चित्रपट व सीरिजबद्दल…

हनुमान : हा चित्रपट भगवान हनुमानाच्या विलक्षण शक्ती प्राप्त होणाऱ्या एका तरुणाभोवती फिरते आणि हा चित्रपट अंजनादरी नावाच्या काल्पनिक गावात बेतलेला आहे. अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, राज दीपक शेट्टी आणि विनय राय यांसारख्या इतर अनेक कलाकारांसह तेजा सज्जा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे. काही रिपोर्टसनुसार, हनुमानचे ओटीटी अधिकार झी-५ ओटीटी माध्यमाने विकत घेतले असून या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात जवळपास २९० कोटींचा गल्ला जमवला आहे. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला असून अनेकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे

मार्वेल्स : मार्वेल्स हा अमेरिकन सुपरहिरोवर आधारित चित्रपट आहे. जो गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ब्री लार्सन, टेयोनाह पॅरिस, इमान वेल्लानी आणि झ्वे ॲश्टन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशातच आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी प्लस हॉटस्टारवर ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.

आर्या ३ : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची बहुचर्चित वेबसीरिज ‘आर्या’ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ही वेबसीरिज हिट ठरल्यानंतर त्याचा पुढचा भाग ‘आर्या-२’देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यालाही प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला. अशातच आता ‘आर्या-२’चा पुढचा सीझन म्हणजेच ‘आर्या-३ अंतिम वार’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या ९ फेब्रुवारीला डिज्नी+हॉटस्टारवर ही सिरिज प्रदर्शित होणार आहे. सुष्मिता व्यतिरिक्त या चित्रपटात इला अरुण, सिकंदर खेर, विकास कुमार, इंद्रनील सेनगुप्ता, माया सराव, गीतांजली कुलकर्णी, वीरेन वझिरानी आणि विश्वजीत प्रधान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

आणखी वाचा – वाडा, तिथेच मंदिर अन्…; स्वत:च्या मूळ गावी पोहोचला संकर्षण कऱ्हाडे, अंबेजोगाईचं दर्शनही घेतलं, म्हणाला, “घरच्या मारुतीच्या…”

भक्षक : अभिनेत्री भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेला ‘भक्षक’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर ही पत्रकार वैशाली सिंहच्या प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ‘सीआयडी’ फेम अभिजीत म्हणजेच आदित्य श्रीवास्तव खलनायक बन्सी साहूची भूमिका साकारणार आहे. तर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर यात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असही म्हटलं जात आहे. भूमीचा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

आणखी वाचा – विजय सेतुपतीबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन, दारुच्या पैशांसाठी लेकाने बेदम मारहाण केली अन्…; धक्कादायक प्रकार समोर

गुंटूर कारम : महेश बाबूची मुख्य भूमिका असलेला गुंटूर कारम हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम तसेच कन्नड अशा विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गुंटूर कारमचे दिग्दर्शन त्रिविक्रम यांनी केले आहे आणि त्यात रम्या कृष्णा, प्रकाश राव, श्री लीला, जयराम, वेनेला किशोर, ईश्वरी राव आणि राव रमेश यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. येत्या ९ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शन होणार आहे.

Tags: Aarya 3Bhakshakentertainment newsGuntur KaramHanumanMarvelsott entertainment newsOTT Movies & Webseriesott newsआर्या ३ओटीटी चित्रपट व वेबसीरिजओटीटी बातमीगुंटूर करमभक्षकमनोरंजन बातमीमार्वल्सहनुमान
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Actress Mrinal Kulkarni has shared a special post praising daughter in law Shivani Rangole

"तब्येत सांभाळा नाहीतर…", सूनबाईंवर जीवापाड प्रेम करतात मृणाल कुलकर्णी, फोटो पोस्ट करत म्हणाल्या, "मास्तरीन बाई…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.