शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीचे ब्रेकअप, २ वर्षांनी विभक्त होण्याचा घेतला निर्णय, ‘या’ कारणामुळे तुटले नाते

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 22, 2024 | 11:14 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Kundali bhagya fame actress anjum fakih breakup with boyfriend rohit jadhav after 2 year of relationship

‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीचे ब्रेकअप, २ वर्षांनी विभक्त होण्याचा घेतला निर्णय, ‘या’ कारणामुळे तुटले नाते

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘कुंडली भाग्य’ आणि मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंजुम फकीह. आपल्या अभिनयामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.  अंजुमने नुकतेच बॉयफ्रेंड रोहित जाधवबरोबर ब्रेकअप केले असल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोघे रिलेशनमध्ये होते. पण आता त्यांच्यात काही कारणास्तव बिनसले असल्याची चर्चा सुरु आहे.

अंजुम-रोहित यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. अंजुम फकीहने अद्याप तिच्या ब्रेकअपबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पण  काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने त्यांच्या ब्रेकअपची माहिती दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. परंतु हे दोघे नुकतेच एका सहलीला गेले होते. तिथे काही कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि या भांडणामुळे हे दोघे वेगळे झाले असल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Anjum Fakih (@nzoomfakih)

आणखी वाचा – “मराठी वाचता येत नाही अन्…”, सुप्रिया पिळगांवकरांनी घेतला होता लेकीसाठी मोठा निर्णय, श्रियाने स्वतःच सांगितला किस्सा, म्हणाली, “शाळा बदलण्याचा…”

या सहलीदरम्यान, त्यांच्यात नेमके असे काय घडले? की या दोघांचे ब्रेकअप झाले. याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याशिवाय अंजुम व रोहितने सोशल मीडियावरही एकमेकांना अनफॉलो केल्याची माहिती मिळत आहे. तसेच, ‘कुंडली भाग्य’ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरून रोहितसोबतचे सर्व फोटो हटवले आहेत. 

आणखी वाचा – “त्याच्या विवाहबाह्य…”, शोएब मलिकच्या सानिया मिर्झाबरोबरच्या नात्यावर बहिणीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “म्हणून तिने घटस्फोट…”

दरम्यान, अंजुमने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती व तिचा प्रियकर रोहित हे दोघे कोविडच्या काळात एकमेकांना भेटले होते. जेव्हा ती गोव्यात ‘कुंडली भाग्य’च्या टीमसह शूटिंगसाठी गेली होती. त्यादरम्यान, ती रोहितशी मेसेज व व्हिडिओ कॉलद्वारे बोलायची. त्यावेळी रोहितने अचानक गोव्यात येऊन तिला आश्चर्यचकित केले होते. या काळात दोघांनी गोव्यात एकत्र ईदही साजरी केली होती. याच भेटीत अंजुमने रोहितला तिचे त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगितले होते आणि तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. मात्र आता त्यांच्यात काही कारणावरून ब्रेकअप झाले आहे आणि त्यांच्या या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.

Tags: Anjum Fakihbollywood actressBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsHindi serialKundali BhagyaRohit Jadhavअंजुम फकीहकुंडली भाग्यबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजनमनोरंजन बातमीरोहित जाधवहिंदी मालिका
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Alia Bhatt, Ranbir Kapoor, Vicky Kaushal, Katrina Kaif, Madhuri Dixit, Amitabh Bachchan attended the shree ram pran pratishtha ceremony in Ayodhya

अयोध्येत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी, पारंपरिक लुकने वेधले लक्ष, फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.