गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अयोध्येत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी, पारंपरिक लुकने वेधले लक्ष, फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 22, 2024 | 12:05 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Alia Bhatt, Ranbir Kapoor, Vicky Kaushal, Katrina Kaif, Madhuri Dixit, Amitabh Bachchan attended the shree ram pran pratishtha ceremony in Ayodhya

अयोध्येत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी, पारंपरिक लुकने वेधले लक्ष, फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Ayodhya Ram Mandir : आज सर्वत्र राममय वातावरण झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. अवघा देश आज रामनामात दंग झाला आहे. आज २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भारतातील क्रिकेट, उद्योजक, मनोरंजन यासह कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. त्यांच्या लूकची सध्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर व आलिया या सोहळ्यासाठी मुंबईहून अयोध्येला रवाना झाले. यावेळी रणबीरने पांढरा कुर्ता व धोतर असा वेश परिधान केला. तर आलियाने आकाशी रंगाची साडी परिधान केली आहे. त्यांच्यासोबत रोहित शेट्टीदेखील अयोध्येला रवाना झाले आहेत. माधुरी दिक्षित व श्रीराम नेने यांनादेखील अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी खास निमंत्रण देण्यात आलं आहे. यावेळी पिवळ्या साडी भरजरी साडीमध्ये माधुरीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. तर श्रीराम नेने हेदेखील मरुण रंगाच्या पठाणी लुकमध्ये दिसले. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दोघंही उपस्थित राहणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीचे ब्रेकअप, २ वर्षांनी विभक्त होण्याचा घेतला निर्णय, ‘या’ कारणामुळे तुटले नाते

यावेळी विकी कौशल व कतरीना कैफचाही खास लूक पाहायला मिळाला. कतरीनाने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे. तर विकीने शेरवाणी परिधान केली आहे. तर अभिनेते जॅकी श्रोफ यांनीदेखील पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा व त्यावर केशरी रंगाची शाल परिधान केली आहे. आयुष्मान खुरानादेखील अयोध्येच्या दिशेनं रवाना झाला आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तो हजेरी लावणार आहे. याबरोबरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील आयोध्येला रवाना झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “मराठी वाचता येत नाही अन्…”, सुप्रिया पिळगांवकरांनी घेतला होता लेकीसाठी मोठा निर्णय, श्रियाने स्वतःच सांगितला किस्सा, म्हणाली, “शाळा बदलण्याचा…”

आदी कलाकारांसह रणदीप हुड्डा, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, कैलाश खैर, मधुर भांडारकर, मनोज जोशी, हेमा मालिनी, बिग बी अमिताभ बच्चन हेदेखील अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. तसेच क्रिकेट जगतातूनही विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी व आणखी बरेच क्रिकेटर्स जाणार आहेत.  

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

Tags: अयोध्याअनुपम खेरअमिताभ बच्चनश्रीराम नेनेमनोज जोशीमधुर भांडारकरमाधुरी दीक्षितआयुष्मान खुरानाआलिया भट्टकतरिना कैफकैलाश खैररणबीर कपूररणदीप हुड्डाराम मंदीररोहित शेट्टीहेमा मालिनीजॅकी श्रोफविवेक ओबेरॉयalia bhattamitabh bachchananupam kherAyodhyaayushmann khurranahema malinijackie shroffKailash Khairkatrina kaifMadhur Bhandarkarmadhuri dixitmanoj joshiPran PratishtaRam Templeranbir kapoorrandeep hoodarohit shettySriram NeneVivek oberoi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Spruha Joshi On Audition

"इंडस्ट्रीत खूप काम केल्यामुळे…", स्पृहा जोशी ऑडिशनला जाण्यासाठी द्यायची नकार, स्वतःच खुलासा करत म्हणाली, "माझा मुद्दा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.