‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतात. एकामागोमाग एक आशयघन कथानक असलेल्या मालिका समोर आल्याने प्रेक्षकांना त्या विशेष विशेष भावल्या. या वाहिनीवरील मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असलेल्या पाहायला मिळाल्या. स्टार प्रवाह वाहिनीने व या वाहिनीवरील मालिकांनी टीआरपीच्या शर्यतीत कायमच आपलं स्थान टिकवुन ठेवलं. या वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’, ‘आई कुठे काय करते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. (Premachi Goshta TRP Race)
यापैकी ‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीलाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. मालिकेच्या रंजक कथानकामुळे हे सारं घडल आहे. मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेने टीआरपीचा पहिला नंबर काही सोडला नाही. यानंतर आता मालिकेच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण ठरलं तर मग मालिकेला मागे टाकत आता आणखी एक मालिका टीआरपीच्या शर्यतीत उतरली आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका सुरु झाली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेतील मुक्ता-सागरची जोडीही प्रेक्षकांना आवडू लागली आहे. त्यांची लुटुपुटुची भांडण ही प्रेक्षकांना आवडू लागली. कमी वेळात या मालिकेने ‘ठरलं तर मग’ या मालिकेला मागे टाकत टीआरपीच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला.
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका मुक्ता-सागरच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. सागरची लेक सईच्या प्रेमाखातर लग्नाला तयार झालेले मुक्ता-सागर लवकरच आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. अशातच मालिकेत मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. सावनीच्या तमाशानंतर मुक्ता सागरबरोबर लग्न मोडणार असल्याचं, पाहायला मिळणार आहे. आता मालिका नेमकं कोणतं रंजक वळण घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.