बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोनवेळा अंगावरुन बैलगाडी गेली, टमटमची धडक अन्…; ८५व्या वर्षीही शेती करणाऱ्या आजोबांना पाहून मराठी अभिनेता भावुक, म्हणाला, “अशी माणसं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 4, 2024 | 7:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sandeep pathak instagram post

दोनवेळा अंगावरुन बैलगाडी गेली, टमटमची धडक अन्…; ८५व्या वर्षीही शेती करणाऱ्या आजोबांना पाहून मराठी अभिनेता भावुक, म्हणाला, "अशी माणसं…"

मनोरंजन क्षेत्रामध्ये संदीप पाठक हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. तो आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाबरोरबच तो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो अनेक फोटो व व्हिडीओ आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकताच त्याने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. (sandeep pathak instagram post)

संदीपने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ८५ वर्षांचे आजोबा दिसत आहेत. यामध्ये तो या आजोबांचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो आजोबांशी संवाद साधताना दिसत आहे. यामध्ये तो आजोबांना म्हणाला की, “मी धाराशीवला ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाच्या प्रयोगासाठी आम्ही जात आहोत. पण तुम्हाला काठी टेकताना पाहून चालताना पाहिले. तुम्ही इतके वाकून का चालत आहात? तुम्हाला काही झालं आहे का?”, त्यावर आजोबा उत्तर देताना म्हणाले की, “माझ्या अंगावरुन दोन वेळा बैलगाडी गेली आणि एका टमटमनेदेखील टक्कर मारली आहे”.

आणखी वाचा- “अंग दिसू नये म्हणून मी…”, साडी नेसण्यावरुन भाऊ कदम यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “जाड असल्यामुळे पोट वगैरे दिसणं…”

View this post on Instagram

A post shared by Sandeep Shyamrao Pathak (@mesandeeppathak)

त्यानंतर संदीपने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “प्रवासात ८५ वर्षांचे आजोबा भेटले. दोन वेळा अंगावरुन बैलगाडी गेली आणि त्यानंतर टमटमनेही धडक दिली. तरीही जगण्याची उमेद व इच्छाशक्ती कायम आहे. या वयातदेखील आजोबांनी शेतीकडे दुर्लक्ष केले नाही. अशी माणसं मला जगण्याची प्रेरणा देतात आणि मला जगण्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकवतात. आजोबा, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो”.

आणखी वाचा – शेखर सुमनच्या लेकाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती कंगना रणौत, अभिनेत्रीकडून त्याचं शारिरीक शोषण, काळी जादू केल्याचे आरोप, काय घडलं?

त्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर त्याच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “माणूस हा जमिनीवरच शोभून दिसतो संदीप दादा तुम्ही मन जिंकल”, दुसरा चाहता लिहितो की, “सर तुम्ही अशाच सकारात्मक स्टोरी आमच्यासमोर आणत असता. ते आम्हाला खूप भारी वाटतं”. संदीप नेहमी वृद्धांना मदत करताना दिसतो.

Tags: instagraminstagram postsandeep pathak
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
05 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

कर्क राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मिळणार यश, तर कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात मिळेल यश, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.