‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत मोठं वळण- मालिकेत होणार स्वामीसुताची एन्ट्री

Vikas Patil New Serial
Vikas Patil New Serial

अनेक मालिका चित्रपटातून अभिनेता विकास पाटील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परंतु बिग बॉस मराठी सीजन तीनमुळे विकासाला खास ओळख मिळाली. तेव्हा पासून विकास प्रकर्षाने प्रेक्षकांच्या नजरेत आला. त्याची आणि विशालची जोडी जय-वीरूच्या नावाने गाजली,बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यानंतर देखील त्यांची मैत्री टिकून आहे त्यामुळे प्रेक्षक कायमच त्यांचं कौतुक करतात.

सध्या विकास स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत पाहायला मिळाला. शालिनीचा भाऊ राहुल ही भूमिका विकासने साकारली. त्याच्या या भूमिकेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.नायक, खलनायक, सहायक अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिकेत विकास पाहायला मिळतो. चार दिवस सासूचे, कुलवधू, लेक माझी लाडाची अशा अनेक मालिकांमधून तो बरच काळ प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे.(Vikas Patil New Serial)

पाहा कोण साकारणार आहे स्वामीसुतांची एंट्री (Vikas Patil New Serial)

कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच पाचशे भागांचा टप्पा पार केला. आध्यत्मिक मालिकांची सध्या चलती आहे. मोठ्या काळापर्यंत या मालिका तग धरून आहेत.प्रेक्षक देखील या मालिकांना चांगला प्रतिसाद देत आहेत. (Vikas Patil New Serial)

हे देखील वाचा – एयरपोर्टवर चाहतीने व्यक्त केलं ‘बी टाऊन’ फेम तमन्ना भाटिया वरचं प्रेम

जय जय स्वामी समर्थ या मालिकेत आता अभिनेता विकास पाटील याची नवीन एन्ट्री होणार आहे. स्वामीसूत हे पात्र विकास पाटील साकारणार असल्याची माहिती त्यानी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर फोटो शेअर करून दिली आहे.विकासाला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Madhurani Prabhulkar Story
Read More

‘तुझी खूप गरज आहे..’ म्हणत नेटकऱ्यांनी अरुंधतीला घातलं साकडं

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. असं असताना मालिकेत आता…
Prarthana Behere Career
Read More

सिनेसृष्टीमध्ये प्रार्थनाला १४ वर्ष पूर्ण-रेशीमगाठ च्या टीमने दिलं सरप्राईज

सिनेसृष्टीमध्ये येणं तिथे टिकून राहणं हा प्रवास सोपा नसतो. प्रेक्षकांचं मन जिंकणं म्हणजे जग जिकंण्यासारखं आहे.आणि आपले लाडके…
Prasad Khandekar Mother
Read More

“कधी कधी वैतागतो मी पण “आईसाठी प्रसादची खास पोस्ट

1 जून म्हणल कि सगळ्यांच्या स्टोरीज वर दिसतात ते अनेकांचे वाढदिवस साजरे केले जातात. अभिनेता प्रसाद खांडेकरच्या आईचा…
Man Dhaga Dhaga Jodte Nava
Read More

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये उत्साहात साजरी होणार वटपौर्णिमा

मराठी सणांमध्ये अत्यन्त महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. खऱ्या आयुष्यात जसे हे सण साजरे केले जातात तसेच…