‘आधी त्याने माझ्या आईला मारलं, आणि आता तो मला मारण्याचा कट रचतोय’, राखीने केला आदिलबाबत दावा

Rakhi Sawant New Statement
Rakhi Sawant New Statement

अभिनेत्री राखी सावंत नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. पापाराझी आणि राखी सावंत यांचं एक समीकरणच झालं आहे. राखी नेहमीच त्यांच्या संपर्कात राहून प्रेक्षकांच्या सान्निध्यात राहत असते. वेगवेगळेया कारणामुळे ती चर्चेत असून तिची ही निरनिराळी कारण तीच सगळ्यांसमोर घेऊन येत असते. अशातच राखीने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत एक भयानक सत्य चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. (Rakhi Sawant New Statement)

मध्यंतरी राखी आणि तिचा पती आदिल खान दुराणी यांच्या चर्चाना उधाण आलं होत. राखीने अदिलावर अनेक आरोप केले आणि त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. सध्या आदिल म्हैसूरच्या तुरुंगात बंद आहे. त्यानंतर ही आदिलने राखीची माफी मागत पुन्हा सगळं सुरळीत करण्यासाठी सांगितलं मात्र राखीने अदिलाच्या बोलण्यावर विश्वास दाखवला नाही. दरम्यान आता राखी सावंतचा नवरा आदिल खान दुर्रानी तिला ठार मारण्याच्या तयारीत असल्याचा दावा तिने केला आहे. या सर्व गोष्टी राखीने व्हिडिओ शेअर करून सांगितल्या. आदिल तिला ठार मारण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाल्याने ती शत्रूंपासून दूर राहण्यासाठी दुआ पाठ करत असल्याचे तिने या व्हिडिओतून सांगितलं आहे.

राखीने या व्हिडिओमध्ये म्हटलंय, ‘मित्रांनो, मी शत्रूपासून दूर राहण्यासाठी दुवा वाचत आहे. माझा जीव वाचवण्यासाठी मी हे करत आहे कारण माझा जीव धोक्यात आहे. तुरुंगात आदिल मला मारण्याचा कट रचत असल्याचे नुकतेच समजले. त्यामुळे कुराणात हा श्लोक असेल तर मी तो वाचीन. दुवा वाचल्यानंतर राखी म्हणाली, ‘मी नुकतीच ही दुवा वाचली आहे. युनूस जेव्हा माशाच्या पोटात होता तेव्हा त्याने तीन दिवस रात्रंदिवस ही दुवा वाचली होती. मी ही दुवा वाचली आहे. आदिल… ज्याचे अल्लाह रक्षण करतो त्याला तुम्ही मारू शकत नाही. माझा विश्वास आहे की तू मला मारू शकत नाहीस. अल्लाह माझा रक्षणकर्ता आहे. मारेकऱ्यापेक्षा मोठा. मी दुवा वाचली आहे. माझी प्रार्थना मान्य होवो. तुला मला मारायचे आहे का? मालमत्तेसाठी? बदला घेण्यासाठी?’ असं तिने म्हटलंय.(Rakhi Sawant New Statement)

राखीने केला आदिलबाबत खुलासा (Rakhi Sawant New Statement)

‘ईटाईम्स’च्या वृत्तानुसार, राखी सावंत हिने तिच्या एका शुभचिंतकांचे फोन कॉलचे व्हॉईस रेकॉर्डिंग देखील शेअर केले आहे. त्यात तो म्हणतो, ‘मला कळलेली गोष्ट मला तुला सांगायची आहे. मला माझी ओळख लपवायची आहे मात्र मी तुमचा शुभचिंतक आहे. आदिलच्या खोलीत काही लोक आहेत, त्याने तुला मारण्यासाठी काही लोकांशी करार केला आहे. गेल्या काही काळापासून तो या सगळ्याच नियोजन करत होता. तो सर्व पोलिसांना विकत घ्यायलाही तयार होता.’

हे देखील वाचा – ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत मोठं वळण- मालिकेत होणार स्वामीसुतांची एन्ट्री

त्यानंतर राखी त्या शुभचिंतकाशी बोलते, ‘मी जेव्हा रमजानमध्ये उपवास ठेवला होता तेव्हाच मी त्याला माफ केले होते. त्याने माझ्या आईची हत्या केली, माझी फसवणूक केली आणि माझे पैसे घेतले पण तरीही मी त्याला माफ केले आणि सर्व काही अल्लावर सोडले. तुला खात्री आहे की तो मला मारण्याचा कट आखत आहे?'(Rakhi Sawant New Statement)

यावर उत्तर देत ती व्यक्ती म्हणतेय, ‘होय मी कन्फर्म करू शकतो की तो तुला मारण्याचा विचार करत आहे. मी तुला शब्द देतो आणि मी तुझा साक्षीदार होऊ शकतो. त्याला या महिन्यात जामीन मिळणार असल्याचेही मला समजले आहे. कृपया माझ्या नावाने तक्रार दाखल करू नको. माझे नाव फरहान आहे पण कृपया पोलिसांना सांगा की मी फोन केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Vicky Kaushal Katrina Kaif
Read More

कतरीना कैफ पती विकी कौशलच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात आहे व्यस्त

बॉलिवूड चित्रपटांची सध्या चलती सुरु असताना अशातच ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हवा करायला सुरुवात…
Adipurush in 400 Club
Read More

अबब! प्रभासच्या ट्रोल झालेल्या “आदिपुरुषची” प्रदर्शना आधीच ४०० कोटींची कमाई

एखादा चित्रपट जेव्हा वादाच्या बोव्र्यात अडकतो तेव्हा त्याचा फायदा किंवा नुकसान दोन्ही गोष्टी होऊ शकतात. असाच काहीस झालाय…
Gufi Paintal Health update
Read More

‘महाभारत’ फेम शकुनी मामा म्हणजेच गुफी पेंटल यांची प्रकृती खालावली

इंजिनिअर ते अभिनेता म्हणून सिनेविश्वात पदार्पण करणारे आणि सर्वत्र गाजलेल्या ‘महाभारत’ या मालिकेतून शकुनी मामाची भूमिका साकारणारे आपले…
Naseeruddin Shah Troll
Read More

‘नसिरुद्दीन यांची नियत चांगली नाही..’ म्हणत भाजप नेते मनोज तिवारी यांनी साधला निशाणा

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बाजी मारली असली तरी या चित्रपटाला घेऊन होणारे वाद काही संपलेले नाहीत. सुदिप्तो…
Ritesh Deshmukh Son Birthday
Read More

सलमान खानच्या बहिणीचं-रितेश देशमुखचा मुलगा रायलसाठी खास गिफ्ट

रितेश आणि जिनीलीया म्हणजेच महाराष्ट्रचे लाडके दादा वहिनी त्यांच्या रोमॅंटिक अंदाजामुळे कायमच चर्चेत असतात.कलाकार किती ही मोठा झाला…
Sara Ali Khan Troll
Read More

‘मी मंदिरात जाणार, लोकांना जे म्हणायचंय ते म्हणूदे’, म्हणत सारा अली खानने दिल ट्रोलर्सला उत्तर

बॉलिवूडमधील लाडकी अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या…