आजकाल कलाकारांचा एयरपोर्ट लूकची सध्या क्रेझ असलेली पाहायला मिळते. बी टाऊन सेलिब्रिटीज म्हणा, स्टारकिड्स या सगळ्यांच्या एअरपोर्ट लूकची झलक हल्ली काही सेंकदात आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळते. फोटोग्राफर्स दिवस रात्र या कलाकारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात आणि ते दिसताच क्षणी त्यांचे अपडेट्स सोशल मीडियावरून प्रेक्षकांसमोर आणतात.
प्रेक्षकांनाही हे मनोरंजन हवंच असत. बरं हे बी टाऊन सेलिब्रिटी एयरपोर्ट वर जेव्हा दिसतात तेव्हा तेथील त्यांचा चाहतावर्ग हा त्यांच्यासोबत फोटो काढायला त्यांच्याशी संवाद साधायला पुढे येतो. याची ही झलक बॉलिवूड फोटोग्राफर्स कडून मिळते.(Tamanna Bhatia Fan Moment)
अशातच अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा एयरपोर्ट लुक नुकताच प्रेक्षकांच्या सामोरं आला आहे. यांत तमन्नासोबत तिची एक चाहती सुद्धा दिसतेय. या सेलिब्रिटींचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आणि प्रत्येकाला आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याचा मोह ही आवारात नाही. अशातच तमन्ना तिच्या चाहती सोबत एयरपोर्ट वर दिसली आहे. बरं तिच्या चाहतीने तमन्ना साठी खास सरप्राईझ देखील आणलं आहे. पुष्पगुच्छ देत तिने तमन्नाच स्वागत केलंय आणि सोबत भेटवस्तू ही दिली आहे. इतकंच नव्हे तर तमन्ना आणि तिच्या आईसोबतचा फोटो फ्रेम भेट म्हणून सुद्धा दिली आहे.
पाहा तमन्नाचे चाहतीसोबतचे एयरपोर्टवरील खास क्षण (Tamanna Bhatia Fan Moment)
कधी कधी चाहते या कलाकारांवर भरभरून प्रेम करतात आणि आपल्या या कलाकारांकडून त्यांना फक्त भेटीची अपेक्षा असते. तमन्ना ने तिच्या चाहतीचे आभार मानले असून तिला जवळ घेत एक फोटो देखील काढला आहे. सुंदर अदाकारी आणि सौंदर्याने मोहळ घालणाऱ्या तमन्नाने आजवर साऱ्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.(Tamanna Bhatia Fan Moment)
हे देखील वाचा – ‘सात जन्माचं माहित नाही पण…’ असं म्हणत अरुण कदम यांची ती पोस्ट चर्चेत’
बरेचदा हे कलाकार पल्ला गाठण्याच्या घाईत असतात तेव्हा त्यांना चाहत्यांना वेळ देणं शक्य होत नाही, अथवा जास्त चाहते असतील तर त्यांचा वेळ ही जास्त लागतो म्हणून ते कित्येकदा सरळ निघून जातात. तर या सगळ्यामागे बॉलिवूड फोटोग्राफर्सची मेहनत असते.