लोकप्रिय मालिकांच्या यादीत एका मालिकेचं नाव आवर्जून घेतलं जाईल ती मालिका म्हणजे दुर्वा. बरं या मालिकेची आणखी एक खासियत म्हणजे लाखो दिलांच्या हृदयावर राज्य करणारी रूपसुंदरी म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने या मालिकेतूनच सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यामुळे दुर्वा ही मालिका साऱ्यांच्याच अजूनही लक्षात आहे. या मालिकेचे १००० हुन अधिक भाग प्रदर्शितही झाले. (Vinay Apte birth Anniversary)
या मालिकेने आणि मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. मालिकेचे १००० भाग पूर्ण व्हावेत अशी मनोमनी इच्छा बाळगणारे या मालिकेतील एक ज्येष्ठ कलाकार आज आपल्यात नाही, आणि मालिकेच्या यशआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. याबद्दल हृताने मालिके दरम्यान घेतलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं.
पाहा काय म्हणाली विनय आपटे यांच्याबद्दल हृता (Vinay Apte birth Anniversary)
ज्येष्ठ सिने अभिनेते विनय आपटे आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण नेहमीच येते, हृतानेही एका कार्यक्रमादरम्यान विनय आपटेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दिग्गज अभिनेत्यासोबत काम आणि पहिलीच मालिका यामुळे हृताला सुरुवातीला दडपण आलंच होत. अर्थात नवोदित कलाकाराला आलेलं दडपण अचूक हेरण्यात विनय आपटे यांचा हातखंडा होता. हृताचीही पाहिलंच मालिका असल्याने त्यांनी सांभाळून घेत प्रोत्साहित केलं. (Vinay Apte birth Anniversary)
हृताने एक किस्सा सांगत विनय आपटे यांच्याबद्दलचा आदर कसा द्विगुणित झाला याबाबत सांगितलं आहे, हृता म्हणाली, एकीकडे माझी कॉलेजची दुसऱ्या वर्षाची परीक्षा आणि दुसरीकडे शूटिंगही सुरू होत. एक दिवस पेपर देऊन सेटवर पोहोचायला मला थोडा उशीर झाला. विनय आपटे माझी वाटच बघत होते. आल्या आल्या ते मला म्हणाले की, ‘खरंतर मी कधी कुणासाठी थांबत नसतो. पण तुझी परीक्षा आहे असं कळलं. आता पटकन तयार हो आणि शूटिंगला सुरूवात करूया.’ त्यांच्या या बोलण्यानं माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला.’(Vinay Apte birth Anniversary)
हे देखील वाचा – वीणाचा भूतकाळ येणार समोर?
हृताने आणखी एक विनय आपटे यांच्यासोबतच्या भावुक करणारी गोष्ट देखील शेअर केली आहे. हृता म्हणाली की, विनय आपटे आजारी असताना मी त्यांना भेटायला गेली होती. तेव्हा ते म्हणाले,आपल्याला ‘दुर्वा’चे हजार एपिसोड्स पूर्ण करायचे आहेत. मात्र दुर्दैवाने काही दिवसातच त्यांच निधन झालं. मात्र दुर्वा मालिकेच्या टीमने आपटेंच १००० भागांचं स्वप्न पूर्ण केलं.
