गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडील रवींद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीरने पहिल्यांदाच शेअर केलेल्या पोस्टची चर्चा, म्हणाला, “रात्री आभाळाकडे पाहिलं अन्…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 11, 2023 | 10:32 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
gashmeer mahajani comeback

वडील रवींद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीरने पहिल्यांदाच शेअर केलेल्या पोस्टची चर्चा, म्हणाला, “रात्री आभाळाकडे पाहिलं अन्...”

मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गश्मीर महाजनीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. गश्मीरने अधिकाधिक मेहनत करत चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. सिनेरसिकांचा हा लाडका अभिनेता गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही आठवड्यांपूर्वी गश्मीरचे वडील व ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर गश्मीरला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. काही दिवसांसाठी त्याने सोशल मीडियापासून दूर राहण्याचं ठरवलं. आता त्याने पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे.

वडिलांच्या निधनानंतर गश्मीरला सोशल मीडियाद्वारे बरंच ट्रोल करण्यात आलं. विविध प्रकारच्या टीका त्याच्यावर करण्यात आल्या. वडिलांची तुला काळजी नाही का?, वडिलांच्या जवळ राहत नव्हता का? असे अनेक प्रश्न त्याला विचारण्यात आले. शिवाय या दुःखाच्या काळात त्याला अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागला. मात्र आता तो या सगळ्यामधून बाहेर पडत आहे. दरम्यान गश्मीरने सोशल मीडियावर वडिलांच्या निधनानंतर खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Video : पत्नीच्या अंत्यसंस्कारादरम्यान ढसाढसा रडला सुप्रसिद्ध अभिनेता, हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं निधन, लग्नाचा वाढदिवस होता पण…

गश्मीरने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. फोटो शेअर करत गश्मीर म्हणाला, “हास्य. कठीण प्रसंगांमध्येही चेहऱ्यावर हास्य ठेवा. हास्यच उत्तम कमबॅक असू शकतं. मी रात्री आभाळाकडे पाहिलं, पण चंद्र काळ्या ढगांमध्ये लपला होता. मी हसलो आणि ढगांमधून माझ्यावर पावसाच्या थेंबाचा वर्षाव झाला”.

आणखी वाचा – “रिक्षावाल्याने मला शिवी दिली अन्…”, वंदना गुप्तेंबरोबर भररस्त्यात घडलेला विचित्र प्रकार, म्हणाल्या, “त्याला मी…”

View this post on Instagram

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer)

“जेव्हा गडद अंधार असतो तेव्हा एका स्मित हास्यामुळे बराच फरक पडू शकतो”. गश्मीरने लिहिलेली पोस्ट अगदी मनाला भावणारी आहे. वडिलांच्या निधनानंतर तो या दुःखामधून सावरत आहे. गश्मीरने पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी विविध कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. तसेच त्याचं पुन्हा एकदा सोशल मीडियावर स्वागत केलं आहे. तू लवकर या सगळ्यामधून बाहेर पड, कायम हसत राहा अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Tags: gashmeer mahajanimarathi movieravindra mahajaniravindra mahajani passed away
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Bigg Boss OTT 2 Jiya Shankar

२० वर्ष वडिलांच्या प्रेमासाठी झगडतेय 'बिग बॉस ओटीटी' फेम जिया शंकर, म्हणाली, "त्यांनी दुसरं लग्न केलं आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.