शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२० वर्ष वडिलांच्या प्रेमासाठी झगडतेय ‘बिग बॉस ओटीटी’ फेम जिया शंकर, म्हणाली, “त्यांनी दुसरं लग्न केलं आणि…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 11, 2023 | 11:16 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss OTT 2 Jiya Shankar

२० वर्ष वडिलांच्या प्रेमासाठी झगडतेय 'बिग बॉस ओटीटी' फेम जिया शंकर, म्हणाली, "त्यांनी दुसरं लग्न केलं आणि..."

ओटीटी विश्वातील रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’चे दुसरे पर्व आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशातच ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस उरले असताना अभिनेत्री जिया शंकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. बिगबॉसच्या घरात असताना जिया शंकर अनेक कारणांनी चर्चेत राहिलेली आहे, विशेष करून, जद हदीदला वडिलांचा दर्जा देण्यापासून ते अभिषेक मल्हानसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांपासून. मात्र, शोमधून बाहेर पडण्याआधी जियाने एल्विश यादव सोबत गप्पा मारत असताना तिच्या वडिलांविषयी मोठा खुलासा केला आहे. ज्यात तिने सांगितलं, की ती गेल्या २० वर्षांपासून तिच्या वडिलांशी बोलली नाही. (Bigg Boss OTT 2 Jiya Shankar)

शोमध्ये जिया आणि एल्विश आणि जिया एकमेकांशी गार्डन एरियात बोलत होते. तेव्हा एल्विशने जियाला विचारलं की, तुला वडिलांची जास्त आठवण कधी येते. तेव्हा ती म्हणाली, “जेव्हा मी दुसऱ्यांची सुखी कुटुंब पाहते, तेव्हा मला माझ्या कुटुंबाची आठवण येते. मी याचे वर्णनही करू शकत नाही. लहानपणी जेव्हा मला कोणी काही बोलायचे, तेव्हा मी धावत वडिलांकडे जायचे. ते माझ्यासाठी खूप प्रोटेक्टिव्ह होते.”

हे देखील वाचा – टायगर श्रॉफचं दिशा पाटनीबरोबर बिनसलं, दिड वर्षांपासून दुसऱ्याच मुलीला करतोय डेट, कोण आहे त्याची नवी गर्लफ्रेंड?

पुढे एल्विश विचारतो, “तुझ्या वडिलांशी आता काही बोलणे होत नाही का?” यावर जिया म्हणाली, “नाही, आम्ही आता बोलत नाही. ते कुठे आहेत, काय करत आहे, कसे दिसत आहे, काय आवाज आहे, काहीच माहित नाही. वर्षांपासून आमचा एकमेकांशी कोणताच संपर्क नाही.” असं म्हणत जियाने तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केल्याचा खुलासा केला आहे. पुढे जिया म्हणते, “आता त्यांचे स्वतःचे कुटुंब आहे. त्यांना पत्नी आणि एक मुलगीही आहे. ते त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहे.”

View this post on Instagram

A post shared by Jiya Shankar (@jiyaashankarofficial)

यानंतरही एल्विश जियाला म्हणतो, की ते तुला अजूनही मिस करत आहे, हे माहिती आहे का ? त्यावर जिया म्हणते, “ते जर खरंच मला मिस करत असतील. तर त्यांनी किमान माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता. पण आता वेळ निघून गेली असून सर्वकाही बदललं आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यात झालेल्या त्रासाचा त्यांनी एकट्याने सामना केला आहे.”

हे देखील वाचा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून किती कमावतो जेठालाल?, दिलीप जोशी यांचं एका एपिसोडचं मानधन आहे तब्बल…

अभिनेत्री जिया शंकर ‘बिग बॉस ओटीटी’च्या आधी अनेक वेब सिरीजमध्ये दिसली असून तिने रितेश देशमुखसोबत ‘वेड’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे. (Bigg Boss OTT 2 Jiya Shankar)

Tags: bigg boss ott 2jiya shankarotttrending
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Prithvik Pratap On Dattu More

पृथ्वीक प्रतापचं मोठं मन, अमेरिकेत शो करत असताना दत्तू मोरेसाठी केली मोठी गोष्ट, प्रियदर्शिनी म्हणते, "पहिल्या दोन शोनंतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.