रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रिक्षावाल्याने मला शिवी दिली अन्…”, वंदना गुप्तेंबरोबर भररस्त्यात घडलेला विचित्र प्रकार, म्हणाल्या, “त्याला मी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 10, 2023 | 6:21 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
vandana gupte talk about her experience

“रिक्षावाल्याने मला शिवी दिली अन्...”, वंदना गुप्तेंबरोबर भररस्त्यात घडलेला विचित्र प्रकार, म्हणाल्या, “त्याला मी...”

सेलिब्रिटी मंडळींना सार्वजनिक ठिकाणी पाहिलं की सामान्य व्यक्तींना त्यांचा हेवा वाटतो. पण एरव्ही प्रवास करत असताना सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनाही विविध अडचणींचा सामना करावा लागतो. काही कलाकार मंडळी कामानिमित्त बाहेर जात असताना स्वतः गाडी चालवतात. अभिनेत्री वंदना गुप्तेही त्यापैकी एक आहेत. पण गाडी चालवत असताना त्यांना एकदा एक विचित्र अनुभव आला. याचबाबत त्यांनी आता भाष्य केलं आहे.

सध्या वंदना गुप्ते ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत ८० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. वंदना यांचा चित्रपटसृष्टीमधील तगडा अनुभव व त्यांच्या भूमिका आजवर सिनेरसिकांनी पाहिल्या. या चित्रपटामध्ये त्यांनी पुन्हा एकदा उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. आता वंदना गुप्ते झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

आणखी वाचा – Vishakha Subhedar Troll: “कितीला विकत घेतलं?” इन्स्टाग्रामला ब्ल्यू टिक मिळाल्यानंतर विशाखा सुभेदार ट्रोल, अभिनेत्री म्हणते, “गीतेवर हात ठेवून…”

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे ‘खुपते तिथे गुप्ते’च्या नव्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये त्यांना गाडी चालवताना आलेल्या अनुभवाबाबत त्या बोलत आहेत. वंदना यांना एकदा एका रिक्षावाल्याने शिवी दिली होती. यावेळी त्यांनी नेमकं काय केलं? हे अगदी खुलेपणाने सांगितलं.

आणखी वाचा – “सावरकरांवर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला तर…” रणदीप हुड्डा-महेश मांजरेकरांच्या वादात अमेय खोपकरांची उडी, म्हणाले, “दुर्देव…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

वंदना गुप्ते म्हणाल्या, “एका रिक्षावाल्याला मी ओव्हरटेक करुन गेले. म्हणून त्याने मला शिवी दिली. त्याने शिवी दिल्यानंतर मी गाडीमधून खाली उतरले. त्याला मी म्हटलं, तू मला शिवी दिली आहेस. मला एक आयडिया माहित होती. मी ती रिक्षा पलटी केली. रिक्षावालाही आतमध्ये बसला होता. मी तशीच गाडीमध्ये बसले आणि तोपर्यंत सिग्नल सुरु झाला”. वंदना यांचा हा अनुभव ऐकून अवधूतही हसू लागला.

Tags: entertainment newsentertainment updatemarathi actressvandana gupte
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Barbie Movie banned in Kuwait

'या' कारणांमुळे 'बार्बी'वर कुवैतमध्ये बंदी; लेबनॉनमध्येही चित्रपट न दाखवण्याचा निर्णय होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.