शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सगळेच नशा करत असल्याचं तिने…”, इमरान हाश्मीने कंगना रणौतला चांगलंच सुनावलं, म्हणाला, “ती एवढी आक्रमक…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 5, 2024 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Emraan Hashmi commented on Kangana Ranaut's nepotism and drug addicts in industry

"सगळेच नशा करत असल्याचं तिने...", इमरान हाश्मीने कंगना रणौतला चांगलंच सुनावलं, म्हणाला, "ती एवढी आक्रमक..."

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी त्याच्या आजवरच्या भूमिकांमुळे व अभिनयामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. मनोरंजन विश्वात त्याची ‘सीरियल किसर’ म्हणून ओळख असली तरीदेखील त्याने त्याच्या आजवरच्या प्रवासात विविधांगी भूमिकाही साकारल्या आहेत. इमरानने रोमँटिक नायकसह गंभीर व खलनायकाच्या भूमिका साकारत त्याचे वेगळेपण कायमच सिद्ध केले आहे. आपल्या अभिनयाने कायमच चर्चेत राहणारा अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या ओटीटीवरील ‘शोटाइम’ या वेबसीरिजमुळे चांगलाच चर्चेत आहे.

‘शोटाईम’ मध्ये इमरान हाश्मीसह अभिनेत्री श्रिया सरन, महिमा मकवाना व मौनी रॉय आदी कलाकारही आहेत. ‘शोटाईम’मधून ग्लॅमरस दुनियेमागची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे. या सीरिजच्यानिमित्ताने इमरान सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्याने अभिनेत्री कंगणा रनौतच्या बॉलीवूडमधील घराणेशाहीवर तसेच ड्रग्स वापराबाबतच्या व्यक्तव्यांवर भाष्य केले आहे. यावेळी इमरानने कंगणाबद्दल त्याचे मत परखडपणे मांडले आहे.

View this post on Instagram

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

इमरानने कंगनाबरोबर ‘गँगस्टर’मध्ये काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. येथून कंगनाने यशाच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत बाहेरची व्यक्ती बनून आपले स्थान निर्माण केले. मात्र, गेल्या काही वर्षांत कंगनाने इंडस्ट्रीतील घराणेशाहीबद्दल बरेच काही सांगितले आहे. त्याने ड्रग्ज घेण्यासह बॉलिवूड कलाकारांची अनेक गुपितेही उघड केली आहेत. आता इमरान हाश्मीने त्यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

आणखी वाचा – “बेंड इडली वडा राम चरण”, शाहरुख खानच्या ‘त्या’ विधानामुळे राम चरणच्या चाहत्यांचा संताप, वर्णद्वेषी असल्याचा किंग खानवर आरोप

इमरानने म्हणाला की, “कंगना एक कलाकार म्हणून खूप चांगली आहे आणि प्रत्यक्षातही व्यक्ती म्हणूनहे ती खूपच चांगली आहे. कदाचित तिचा या इंडस्ट्रीतला अनुभव वाईट असेल, पण इथे सगळेच लोक सारखे नसतात. कंगनाबरोबरचा माझा अनुभव असा होता की, मी ‘गँगस्टर’मध्ये खलनायकाची भूमिका साकारली आणि चित्रपटात तिला केंद्रस्थान दिले. हा जवळजवळ एक महिला केंद्रित चित्रपट होता. त्यामुळे मला माहीत नाही की, या इंडस्ट्रीबद्दल कंगनाचं मत नेमकं कधी बदललं, तिने सर्वांना नशेच्या अधीन असल्याचा दावा का केला? किंवा घराणेशाहीविरोधात ती एवढी आक्रमक का झाली? याबद्दल मलाही ठाऊक नाही”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर जबरदस्ती, किस करण्याचा प्रयत्न अन्…; ‘त्या’ पार्टीमध्ये जॅकी श्रॉफ यांनी दारु पिऊन केला होता धिंगाणा, तेव्हा काय घडलं होतं?

दरम्यान, इमरानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो अलीकडेच सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता तो लवकरच त्याच्या ‘शो टाइम’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना या सीरिजची आतुरता लागली आहे..

Tags: bollywood actorbollywood actressBollywood entertainment newsbollywood newsemraan hashmientertainment newskangana ranautइम्रान हाश्मीकंगणा रानौतबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Shiv Thakare On Manisha Rani

"ज्याच्या हातात जास्त पैसा…", मनीषा राणीने 'झलक दिखला जा ११'चं विजेतेपद पटकावल्यानंतर शिव ठाकरेचं भाष्य, अभिनेत्यावरच भडकले प्रेक्षक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.