रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ज्याच्या हातात जास्त पैसा…”, मनीषा राणीने ‘झलक दिखला जा ११’चं विजेतेपद पटकावल्यानंतर शिव ठाकरेचं भाष्य, अभिनेत्यावरच भडकले प्रेक्षक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 5, 2024 | 1:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiv Thakare On Manisha Rani

"ज्याच्या हातात जास्त पैसा...", मनीषा राणीने 'झलक दिखला जा ११'चं विजेतेपद पटकावल्यानंतर शिव ठाकरेचं भाष्य, अभिनेत्यावरच भडकले प्रेक्षक

‘बिग बॉस ओटीटी सीझन २’मध्ये सतत बडबड करत प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मनीषा राणीने आता ‘झलक दिखला जा ११’ या डान्स रिऍलिटी शोचे विजेतेपद पटकावले आहे. या सीझनमध्ये ‘बिग बॉस १६’चा फायनलिस्ट व मराठी ‘बिग बॉस’चा विजेता शिव ठाकरेदेखील सहभागी झाला होता. मात्र या रिऍलिटी शोमध्ये त्याला टॉप पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळवता आले नाही. “आता ज्याच्या हातात जास्त पैसा आहे तोच विजेतेपदाच्या लायक आहे”, असं म्हणत शिवने मनीषा राणीच्या विजयावर ताशेरे ओढले आहेत. (Shiv Thakare On Manisha Rani)

या प्रवासाबाबत बोलताना शिव म्हणाला की, “त्याला खूप काही शिकायला मिळाले आहे. माझा आजवरचा प्रवास खूप मोठा आहे. देव प्रवासाचा मार्ग पाठवतो. जसे मी खतरों के खिलाडी मध्ये स्पर्धक म्हणून काम केले. त्याच्याप्रमाणे मी झलक दिखला जा ११ मध्ये सहभागी झालो. मी या रिऍलिटी शोमधून काहीतरी खास शिकून बाहेर आलो आहे जे कदाचित मला पैसे देऊनही बाहेर शिकता आले नसते”.

आणखी वाचा – इंडस्ट्रीमधून तुच्छ वागणूक, अपमान अन्…; बहिणीची ‘ती’ हालत बघून करीना कपूरलाही होत होतं दुःख, करिश्माविषयी म्हणालेली, “तिला रडताना…”

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिव म्हणाला की, “‘झलक दिखला जा ११’ या मंचावर तो मनापासून नाचला, त्यामुळेच प्रेक्षकांना तो आवडला. माझा इथवरचा प्रवास खूप लांबचा आहे, त्यामुळे मला लगेच यश मिळण्यासाठी वर जाण्याची गरज नाही, मला पायऱ्या चढत यश मिळवायचं आहे. मी सर्वसामान्यांमधून आलो आहे. हे सर्व माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी स्वप्नवत जीवन जगत आहे. यादरम्यान भेटलेले काही लोक चांगले आहेत, काही वाईट आहेत, मी सर्वांना अगदी जवळून अनुभवले आहे”.

आणखी वाचा – लग्नाआधी हळद का लावली जाते?, नवरी मुलीच्या हातावर मेहंदी का काढतात?, ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं

शिव ठाकरे यांने मनिषा राणीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तिचे चाहते नाराज आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “मला वाटले की, तू खूप छान माणूस आहे, पण तू गर्विष्ठ निघाला”. तर दुसऱ्याने लिहिले, “या व्यक्तीला नृत्याचा डीदेखील माहित नाही जो स्वतःला पात्र समजतो. या नृत्यापेक्षा वार्षिक समारंभातील नृत्य उत्तम आहे. पूर्वी आदर होता, आता शून्य आहे”. तर काहींनी “मनीषा पैशाने जिंकली नाही, ती प्रतिभेने जिंकली”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Tags: entertainmentmanisha rani winnerShiv Thakare On Manisha Ranishiv thakare statementshiv thakare troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Actress aditi Bhatia new car

आता कोणत्या परिस्थितीमध्ये आहे 'ये हैं मोहब्बतें'मधील रुही?, अभिनयक्षेत्र सोडल्यानंतरही लाखो रुपयांची कमाई, नक्की करते तरी काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.