शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बेंड इडली वडा राम चरण”, शाहरुख खानच्या ‘त्या’ विधानामुळे राम चरणच्या चाहत्यांचा संताप, वर्णद्वेषी असल्याचा किंग खानवर आरोप

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 5, 2024 | 10:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ram Charan fans angry after Shah Rukh Khan called Ram Charan an idli

“बेंड इडली वडा राम चरण”, शाहरुख खानच्या ‘त्या’ विधानामुळे राम चरणच्या चाहत्यांचा संताप, वर्णद्वेषी असल्याचा किंग खानवर आरोप

गेले काही दिवस सोशल मीडियावर सर्वत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचीच चर्चा रंगली होती. अशातच नुकताच हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला जगाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळे दिग्गज लोक उपस्थित होते. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. वेडिंग सेलिब्रेशनमध्ये शाहरुख, सलमान व आमिर या तिघांनी ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ गाण्यावर डान्स केला. 

या कार्यक्रमात या चित्रपटाचा नायक राम चरणदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे त्यानेही या तीन खानबरोबर गाण्यावर ठेका धरला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यावेळी शाहरुखच्या एका कृतीमुळे तो सध्या सोशल मीडियावर टीकेचा धनी झाला आहे. शाहरुख खानने राम चरणला स्टेजवर बोलावताना ‘इडली’ शब्दाचा वापर केला होता, त्यामुळे चाहते चांगलेच संतापले आहेत. राम चरणच्या मेकअप आर्टिस्ट झेबा हसनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शाहरुखवर टीका केली आहे.

आणखी वाचा – लग्नानंतरच्या बायकोच्या पहिल्या वाढदिवसाला प्रथमेश परबने दिलं सरप्राइज, जंगी सेलिब्रेशन केलं अन्…; म्हणाला, “तुझं हसणं, रडणं, रुसणं…”

राम चरणची मेकअप आर्टिस्ट झेबा हसनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “बेंड इडली वडा राम चरण, तू कुठे आहेस? राम चरणसारख्या कलाकाराचा इतका अनादर”. यापुढे तिने दक्षिणेकडील कलाकारांचे कौतुक किंवा आदर कसा केला जात नाही याबद्दल “हे विचित्र आहे की प्रत्येकजण आम्हाला कमी पैसे देऊ इच्छितो. कारण आम्ही दक्षिण भारतीय आहोत, याउलट अभिनेता दिल्ली किंवा मुंबईचा असेल तर त्याच गोष्टीसाठी अभिनेत्याला तिप्पट रक्कम देणे योग्य मानले जाते.” असं म्हणत निराशा व्यक्त केली आहे.

Shahrukh Khan is being racist to South Indians by calling "Ram Charan idli" after a South Indian director gave him the biggest hit of his career#ShahRukhKhan #RamCharan pic.twitter.com/Vc5mcg7dLm

— BHAI (@salmanbhaijaann) March 4, 2024

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : कोणत्या राशीसाठी आजचा दिवस असणार आहे अगदी खास?, भरपूर होईल धनलाभ, जाणून घ्या…

दरम्यान, राम चरणच्या काही चाहत्यांनीही शाहरुखवर टीका करत असं म्हटलं आहे की, “शाहरुख खान दक्षिण भारतीय राम चरणला इडली म्हणत त्याच्याशी वर्णद्वेषी वागतो आहे, एका दक्षिण भारतीय अभिनेत्याने त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट दिल्यानंतर, शाहरुख खान दक्षिण भारतीयांना ‘राम चरण इडली’ म्हणत त्यांच्याशी वर्णद्वेषी वर्तन करत आहे.”

Tags: bollywood actorBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsram charanshah rukh khansouth actorदक्षिण अभिनेताबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीराम चरणशाहरुख खान
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
maharashtrachi hasyajatra australia tour

Video : बीचवर धमाल डान्स, नंतर गाडीतच डुलक्या अन्…; ऑस्ट्रेलियामध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमचा धिंगाणा, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.