असं म्हणतात रडवणं सोप्प असतं परंतु तितकंच कठीण असतं ते म्हणजे हसवणं. मराठी सिनेविश्वात अनेक विनोदी कलाकार आहेत जे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. याच कलाकारांमधील अशीच एक विनोदी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखाने इतर शैलीतल्या भूमिका कमी परंतु विनोदी भूमिकाच मोठ्या प्रमाणात साकारल्या आहेत. विशाखाचे विनोदी पंच असो किंवा तिने कोणतीही भूमिका साकारताना त्या भूमिकेचा पकडलेला लेहजा प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. आज विशाखा हिचा वाढदिवस असून या निमित्ताने जाणून घेऊयात “विशाखा सुभेदार” चे काही फॅक्टस (तथ्ये)..(vishakha subhedar)
विशाखाने शाळेत असल्यापासून बालनाट्यात काम करायला सुरुवात केली. तिच्या अभिनयाला खरी सुरुवात झाली ती ईथुनचं.
पहा विशाखा सुभेदारबद्दल काही तथ्ये (vishakha subhedar)
विशाखा ही उत्तम नृत्यांगना असून तिने “भरतनाट्यम” या नृत्यप्रकारातून डिग्री मिळवली आहे. याच सोबत विशाखा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यामुळे तिची कला सोशल मीडियावर सादर करत असते.
“नवरी नटली सुपारी फुटली” या मराठी चित्रपटापासून विशाखाने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.
विशाखाने “सौजन्याची ऐसी तैसी” या नाटकात साकारलेली “नानी” ही भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. या सोबतच विशाखाने अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले असून सध्या तिचे “कुर्रर्रर्र” हे नाटक प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे.
====
हे देखील वाचा – अक्षया नाईकची नवी इनिंग; नक्की काय शिजतंय?
====
“मन उधाण वाऱ्याचे” या जुन्या मराठी मालिकेत तिने खलनायिकेची सुद्धा भूमिका साकारली होती.(vishakha subhedar)
“सुपर नानी” या हिंदी चित्रपटात विशाखाने हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्री “रेखा” सोबत स्क्रीन शेअर केली होती.
विशाखा सुभेदार विवाहित असून तिची आणि तिच्या पतीची भेट “काकस्पर्श” या नाटकाच्या सेटवर झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्न गाठ बांधली.
अनेक विनोदी भूमिका साकारल्यानंतर आणि हास्यजत्रेसारख्या विनोदी रियालिटी कार्यक्रमात काम केल्या नंतर, काही तरी वेगळी भूमिका साकारावी असे विशाखाला वाटल्यामुळे तिने “महाराष्ट्राची हास्यजत्रा” या कार्यक्रमातून निरोप घेतला. सध्या विशाखा “शुभविवाह” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून ती सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.