शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षया नाईकची नवी इनिंग; नक्की काय शिजतंय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 22, 2023 | 8:45 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
akshaya naik new inning

akshaya naik new inning

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. या मालिकेत लतिका ही भूमिका साकारुन तिने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. त्यामुळे तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठीही नेटकरी उत्सुक असतात. अक्षया कायम चाहत्यांसोबत काही ना काही गोष्टी शेअर करत असते. तर सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते. आणि सोशल मीडियावरील तिच्या पोस्टने चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. अशातच अक्षयाच्या एका पोस्टने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.(akshaya naik new inning)

पहा अक्षयाची नवी सुरुवात (akshaya naik new inning)

इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट शेअर करत अक्षयाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. यांत तिने एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने फोटोसोबत घरगुती जेवण करणाऱ्या वस्तूंचा समावेश केला आहे. आणि नवीन प्रोजेक्टची माहिती असे कॅप्शन दिले आहे. अक्षयाची ही पोस्ट पाहून नक्की काय शिजतंय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खाण्यावर आधारित तिचा नवीन कोणता तरी प्रोजेक्ट असेल असं वाटतंय.

तर तिची ही पोस्ट पाहून अक्षया लवकरच नवीन चित्रपटात दिसणार का? अक्षया सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून एक्झिट घेणार का? की नवं हॉटेल वगैरे सुरु करून व्यवसायात पदार्पण करतेय का? असे बरेच प्रश्न पडले आहेत. अक्षयाच्या या पोस्टने निर्माण केलेल्या या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असेल याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.(akshaya naik new inning)

====

हे देखील वाचा – गिरगांवच्या शोभायात्रेला कलाकारांची मांदियाळी; त्यांचा पारंपारिक लूक ठरतोय लक्षवेधी

====

अक्षयाने मराठी मालिकांसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे अक्षयला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मालिकेत अक्षयाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. त्यानंतर तिच्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील भूमिकेनेही रसिकांना भुरळ पाडली. अक्षयच्या फोटोशूटचीही सर्वत्र चर्चा असते. सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. आता अक्षयाचा नवा प्रोजेक्ट नेमका काय असेल हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: akshaya naikcolors marathientertainmentits majjamarathi actressmarathi malikamarathi serialnew inningnew startsundara manamadhye bharli
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
vishakha subhedar

विशाखा सुभेदार बद्दल तुम्हाला हे माहित आहे का ?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.