सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Chahatt Khanna divorce

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, "मला जबरदस्ती…"

Chahatt Khanna divorce : टीव्ही इंडस्ट्री आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ फेम अभिनेत्री चाहत खन्ना सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने नुकतेच तिच्या धर्मांतराविषयी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. चाहतने सांगितले की, इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय तिचा स्वतःचा होता, त्यावर कोणीही तिला जबरदस्ती केली नव्हती. तिने तिच्या घटस्फोटाबद्दल आणि वादांबद्दलही भाष्य केले.

सुभोजीत घोष यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चाहत खन्ना म्हणाल्या, “माझ्या शब्दांचा नेहमीच चुकीचा अर्थ लावला जातो. आजही मी काही बोलले, तर त्याचाच एक भाग उचलून चुकीच्या पद्धतीने मांडला जातो. मी एक अत्यंत धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे. मी दिवाळीइतक्याच प्रेमाने ईद साजरी करते. मी इस्लाम धर्म स्वीकारला आणि तो माझा स्वतःचा निर्णय होता. लोकांनी म्हटले की माझ्यावर जबरदस्ती केली गेली, पण मी तसे कधीच म्हटले नाही. माझा इस्लाम आणि सनातन धर्म या दोन्हींवर विश्वास आहे आणि मी स्वतःला कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित ठेवत नाही.”

आणखी वाचा – “मला कोणताही पश्चात्ताप नाही”, लग्नाच्या तीन वर्षांतच संसार मोडला, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Chahatt khanna (@chahattkhanna)

ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलली, “मला खूप वाईट, निराश आणि घाबरल्यासारखं वाटत होतं. माझ्यासोबत जे घडत होतं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझी प्रतिष्ठा डागाळली जात होती. काही लोक तर असंही म्हणाले की मला काम मिळणार नाही. पण, जसजशी मला आयुष्य आणि लोकांबद्दल अधिक चांगली समज येऊ लागली, तसतसा माझा आत्मविश्वास वाढला आणि या सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटू लागल्या. एके वेळी मी गोंधळलेली होते, पण आता मला पूर्वीपेक्षा अधिक कणखर वाटतं.”

आणखी वाचा – अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, पहिल्या केळवणाचे फोटो समोर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार…

यापूर्वी २०२४ मध्ये, टेलीटॉक इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत चाहत म्हणाली होती, “मला माझ्या निर्णयाबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. घटस्फोटानंतर पुन्हा पूर्ववत होण्यासाठी मला चार ते पाच वर्षे लागली. लग्नासाठी मी स्वतःहून इस्लाम धर्म स्वीकारला; कोणीही मला त्यासाठी जबरदस्ती केली नाही. नंतर मला सांगण्यात आले की माझ्या देवाची पूजा करू नकोस; हाच योग्य मार्ग आहे, आणि मी एका हरवलेल्या मुलासारखी त्याच मार्गावर चालत राहिले.” चाहतने २००६ मध्ये भरत नरसिंगानीशी लग्न केले, पण काही काळानंतरच हा विवाह संपुष्टात आला. त्यानंतर तिने २०१३ मध्ये फरहान मिर्झाशी लग्न केले, पण मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप करत २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तिला झोहर आणि दित्या नावाच्या दोन मुली आहेत, ज्यांच्यासोबत ती पुढे वाटचाल करत आहे.

Tags: bollywood actressChahatt KhannaChahatt Khanna divorce
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
 bollywood bodyguards salary

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, "पगारसुद्धा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.