मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांच्याकडे पाहिलं जातं. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून ही जोडी घराघरात पोहचली.या मालिकेमुळे त्यांना
राणादा आणि पाठकबाई अशी ओळख मिळाली.२०२२ मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली असून यांची चर्चा नेहमी सोशल मीडियावर रंगतेय. यासोबतच लग्नाच्या फोटोंनीदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. लग्नानंतर अक्षया-हार्दिकचा हा पहिला गुढीपाडवा आहे.(Hardik Akshaya)
राणादा आणि पाठकबाईंनी लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यांनी यावेळचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून हा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय .पुण्यातील राहत्या घरी त्यांनी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून हा सण साजरा केला.तिने शेअर केलेल्या फोटोत त्यांचा मराठमोळा लूक देखील पाहायला मिळतोय.पिवळ्या व हिरव्या रंगाच्या साडीत अक्षया पारंपरिक लूकमध्ये दिसून आली.तर हार्दिकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.”पहिला पाडवा” असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी देखील फोटोवर कमेंट करत अक्षय-हार्दिकला गुढीपाडवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(Hardik Akshaya)
====
आणखी वाचा-गिरगांवच्या शोभायात्रेला कलाकारांची मांदियाळी; त्यांचा पारंपारिक लूक ठरतोय लक्षवेधी
====
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरली होती.तेव्हापासूनच या जोडीचा एक चाहता वर्ग निर्माण झालाय. हे जोडपं नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहत असून त्यांच्या फोटो आणि व्हिडीओने नेहमी चाहत्यांचं मनोरंजन करतात. हार्दिकने मालिकेसोबतच चित्रपटातही काम केलं आहे. हर हर महादेव या ऐतिहासिक चित्रपटात तो झळकला. लवकरच हार्दिक वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपट एका मह्त्वपूर्व भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासोबत तो सध्या सन मराठीवरील सुंदरी या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.तर अक्षया ही सध्या मनोरंजन विश्वात सक्रिय नसून ती आता कोणत्या कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे पाहणं सध्या उत्सुकतेचं असेल.