शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नवऱ्याबरोबर फिरायला गेली अन्…”, आईच्या दुसऱ्या लग्नानंतरच्या पाडव्याबाबत सिद्धार्थ चांदेकरचं भाष्य, म्हणाला, “तिच्या आयुष्यात हस्तक्षेप…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 14, 2023 | 12:47 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
siddharth chandekar mother marriage

“नवऱ्याबरोबर फिरायला गेली अन्...”, आईच्या दुसऱ्या लग्नानंतरच्या पाडव्याबाबत सिद्धार्थ चांदेकरचं भाष्य, म्हणाला, “तिच्या आयुष्यात हस्तक्षेप...”

काही महिन्यांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सिद्धार्थने त्याच्या आईचं दुसरं लग्न अगदी थाटामाटात करुन दिलं. गेल्या काही वर्षांपासून सीमा चांदेकर या एकट्याच संपूर्ण घर सांभाळत होत्या. पण सीमा यांनी नव्याने संसार करायचा ठरवलं आणि सिद्धार्थ व मिताली मयेकरनेही त्याला हसत होकार दिला. आता सीमा चांदेकर त्यांच्या जोडीदाराबरोबर आनंदाने संसार करत आहेत. यंदाच्या दिवाळीचा त्यांचा हा पहिलाच पाडवा आहे. याचबाबत सिद्धार्थाने भाष्य केलं आहे. (siddharth chandekar and mitali mayekar diwali celebration)

दिवाळी पाडव्यानिमित्त सिद्धार्थ व मितालीने ‘इट्स मज्जा’शी दिलखुलास संवाद साधला. यावेळी सिद्धार्थला त्याच्या आईच्या दिवाळी पाडव्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, “लग्न झाल्यानंतर जसं आपले आई-बाबा तुम्हीच आता सणवार करा, प्लॅन करा असं समजुतदारीने सांगतात. आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ पण प्लॅन तुम्ही करा असं म्हणतात. आता ही जबाबदारी आमच्या दोघांची आहे”.

आणखी वाचा – “दुबई ते मुंबई असं हवेत असताना…”, विमानातच साजरा झाला संकर्षण कऱ्हाडेचा वाढदिवस, म्हणाला, “एअर इंडियाने मला…”

“आईला आम्ही म्हटलं की, यंदाचा पाडवा तू सेलिब्रेट कर. ती आताल तिच्या नवऱ्याबरोबर ट्रीपला चालली आहे. ती इथे नाही. तिने मला सांगितलं की, मी लक्ष्मी पूजन, पाडवा वगैरेसाठी इथे नसणार. मी फिरायला चालली आहे. त्यानंतर मला असं वाटलं की, तू जा तुला हवं ते कर. दिवाळी फराळाचा ती व्यवसाय करते. परदेशात वगैरे तिला फराळाची ऑर्डर असते. दसऱ्याचा दिवस संपला की, ती फराळाची ऑर्डर घ्यायला सुरुवात करते. तिचं काम दिवाळीपर्यंत सुरुच असतं”.

आणखी वाचा – सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरने खरेदी केली आलिशान कार, म्हणाला, “बायको मला तुझा…”

“ती फिरायला गेल्यावर मी म्हटलं ठिक आहे आपण आता भाऊबीजलाच भेटुया. भाऊबीजलाच आमचं कुटुंब एकत्र येतं. माझ्या बहिणी वगैरे घरी येतात. तिच्या आयुष्यामध्ये मी आता हस्तक्षेप करावं असं मला वाटत नाही. कारण २० वर्षांनंतर तिला तिचा संसार मिळाला आहे. आणि तो तिच्यापेक्षाही जास्त माझ्यासाठी महत्त्वाचा आहे”. सिद्धार्थ व मितालीचा समजतूदारपणा खरंच कौतुकास्पद आहे. तसेच दोघांनीही मिळून आईचा केलेला सांभाळ आणि सिद्धार्थचे संस्कार त्याच्या बोलण्यामधून व कृतीतून दिसून येतात.

Tags: marathi actormarathi actressmitali mayekarsiddharth chandekar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
prasad oak paris tour with family

आयफेल टॉवर, ट्रेन अन्…; पॅरिसच्या रस्त्यांवर प्रसाद ओक सहकुटुंबिय लुटत आहे सुट्टीचा आनंद, पोस्ट शेअर करत म्हणाला, "पॅरिस…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.