दिवाळीनिमत्त सर्वत्र धामधूम सुरु आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत सगळेचजण दिवाळी स्पेशल खरेदी करताना दिसत आहेत. कलाकार मंडळींनी दिवाळीनिमित्त घर, गाडी घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर ही केली आहे. अशातच आणखी एका मराठमोळ्या व लाडक्या कलाकार जोडीने गाडी खरेदी केली असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. ही लोकप्रिय कलाकार जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर. (Siddharth Mitali New Car)
सिद्धार्थ चांदेकर सध्या ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे विशेष चर्चेत आला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी ‘झिम्मा २’ चित्रपटातील ‘मराठी पोरी…’ या गाण्यावर ठेका धरला होता. त्यांच्या या गाण्यावर थिरकतानाचा रील व्हिडीओ सोशल मीडियावरून अल्पावधीतच बराच व्हायरल झाला होता. सिद्धार्थ व मिताली यांचं नवरा बायकोच बॉण्डिंग किती स्पेशल आहे हे आपण नेहमीच पाहतो.
सिद्धार्थ-मिताली कायमच एकमेकांना सपोर्ट करताना पाहायला मिळतात. तसेच बरेचदा ते परदेशातील ट्रिप एन्जॉय करताना ही दिसतात. याचे अनेक फोटो, व्हिडीओ ते सोशल मीडियावरून शेअर देखील करत असतात. अशातच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धार्थ-मिताली यांनी मिळून पहिली नवी कोरी आलिशान अशी गाडी खरेदी केली असल्याची गुडन्यूज त्यांनी शेअर केली आहे. आलिशान गाडीबरोबर फोटो काढत सिद्धार्थने पोस्ट शेअर केली आहे. “एकत्र मोठे होत आहोत! पहिली ऑटोमॅटिक गाडी एकत्र खरेदी केली. तुझा अभिमान आहे बायको! दिवाळीच्या शुभेच्छा”, असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे. तर मितालीने ही गाडीबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट करत, “माझी लक्ष्मी आली” असं म्हटलं आहे.
मिताली व सिद्धार्थने दिवाळीचं औचित्य साधत ही पहिली नवी कोरी कार घेतली असल्याचं त्यांच्या कॅप्शनवरून कळतंय. तसेच सिद्धार्थने एकत्र गाडी खरेदी करायला मितालीने दिलेला सपोर्ट पाहता, तिचं कौतुक करत अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे. सिद्धार्थ मितालीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.