लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्याने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं असून त्याच्या प्रत्येक भूमिकेला रसिक प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. त्याचबरोबर, तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका उत्तमरीत्या निभावत आहे. इतकंच नव्हे, तर दिग्दर्शन क्षेत्रातही तो आपलं नशीब अजमावत असून ‘चंद्रमुखी’, ‘हिरकणी’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केलं. (prasad oak paris tour with family)
प्रसाद सोशल मीडियावरही बराच सक्रिय असून त्याच्या प्रत्येक फोटो व व्हिडिओला नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळते. त्याचबरोबर, त्याच्या मजेशीर रील्सची देखील अनेकदा चर्चा होते. सध्या प्रसाद त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमधून थोडासा ब्रेक घेत सहकुटुंबीय विदेश दौऱ्यावर गेला असून त्या दौऱ्याचे अनेक फोटोज इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
प्रसाद पत्नी मंजिरी व मुलगा मयंकसह पॅरिसमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. या दौऱ्यातील अनेक फोटोज दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत तो पत्नी मंजिरी व मुलगा मयांकसह पॅरिसच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. त्याचबरोबर तेथील प्रसिद्ध पर्यटनस्थळांचीही झलक त्यांच्या चाहत्यांना दाखवली. अभिनेत्याने या फोटोजला ‘PARIS स्पर्श’ असं कॅप्शन दिलं. त्याची ही पोस्ट समोर येताच अभिनेता जितेंद्र जोशी याने ‘पॅरिस लोखंडे बोलतोय’, अशी मजेशीर कमेंट केली.
हे देखील वाचा – “दुबई ते मुंबई असं हवेत असताना…”, विमानातच साजरा झाला संकर्षण कऱ्हाडेचा वाढदिवस, म्हणाला, “एअर इंडियाने मला…”
तर, नुकतंच या दोघांनी या दौऱ्यातील आणखी एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये प्रसाद व मंजिरी ट्रेनमध्ये बसलेले दिसले. यावेळी ते दोघे ट्रेनमधील बाहेरचे निसर्गरम्य दृश्य पाहत आहे. हा फोटो मंजिरीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला, ज्याला ‘सुकून’ असं कॅप्शन दिलं. या फोटोला देखील चाहत्यांचे प्रेम मिळत असून अभिनेत्री अमृता खानविलकरने “Awwww you guys ya mush mush” अशी कमेंट करत या जोडीचं कौतुक केलं. त्याचबरोबर, पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरचा एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
हे देखील वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचा नवराही आता चित्रपटात काम करताना दिसणार, रुपेरी पडद्यावर दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळणार
दरम्यान, प्रसादचे अनेक मोठे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये ‘धर्मवीर २’, ‘जिलबी’ हे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर, तो ‘वडापाव’ आणि ‘पठ्ठे बापूराव’ या दोन चित्रपटांचं दिग्दर्शन देखील करणार आहे.