शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दुबई ते मुंबई असं हवेत असताना…”, विमानातच साजरा झाला संकर्षण कऱ्हाडेचा वाढदिवस, म्हणाला, “एअर इंडियाने मला…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 14, 2023 | 11:31 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade celebrates his Birthday

"दुबई ते मुंबई असं हवेत असताना…", विमानातच साजरा झाला संकर्षण कऱ्हाडेचा वाढदिवस, म्हणाला, "एअर इंडियाने मला…"

लोकप्रिय मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने विविध नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच अभिनयाबरोबर तो उत्तम निवेदक व कवी देखील असून त्याच्या विविध कार्यक्रमांचे निवेदन करताना दिसतो. सध्या संकर्षणचे ‘नियम व अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘संकर्षण Via स्पृहा’ हे तीन नाटकं रंगभूमीवर सुरु असून त्याच्या सर्वच नाटकांच्या प्रयोगांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केवळ राज्यातच नाही, तर देश-विदेशातही संकर्षणची मोठी फॅन फॉलोविंग बनली आहे. (Sankarshan Karhade celebrates his Birthday)

नुकतंच संकर्षणचा वाढदिवस पार पडला होता. यावेळी त्याने हा वाढदिवस ‘संकर्षण Via स्पृहा’ व ‘नियम व अटी लागू’ नाटकाची टीम, त्याचे कुटुंबीय व मित्रपरिवारासह साजरा केला. त्याचबरोबर, त्याला अनेकांनी खास सरप्राईझ दिलं होतं. संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचे काही फोटोज शेअर केले. ज्यामध्ये तो त्याच्या कुटुंबासह साजरा करताना दिसत असून यावेळी एका चाहत्यांकडून त्याला खास भेटवस्तूदेखील देण्यात आली होती. तसंच संकर्षणचा ‘नियम व अटी लागू’ नाटकाचा प्रयोग नुकतंच दुबईत पार पडला. या प्रयोगानंतर मुंबईत परतताना त्याला विमानात एक खास सरप्राईझदेखील मिळालं होतं.

हे देखील वाचा – “जिथे शाळा सुटल्यावर उनाडक्या करायचो…”, दिवाळी पहाटला फडके रोडवरवरील कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या तितिक्षा तावडेची खास पोस्ट, म्हणाली, “आम्हा दोघींसाठी…”

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

हे फोटोज शेअर करत तो म्हणाला, “फोटो पहिला, वाढदिवस सुरू झाला तेव्हा दुबई ते मुंबई असा प्रवास करत होतो. तेव्हा एअर इंडियाच्या टीमने वाढदिवसानिमित्त छानसं सरप्राईज दिलं. फोटो दुसरा, घरी माझ्यापेक्षा जास्त बाळांनाच केक लवकर कापायचा, खायचा होता. बाबांच्या वाढदिवसाची एक वेगळीच मज्जा आहे. फोटो तिसरा आणि चौथा, ‘संकर्षण Via स्पृहा’ व ‘नियम व अटी लागू’च्या टीमने माझा वाढदिवस कौतुकाने साजरा केला. फोटो पाचवा, ‘तुम्ही माझे आवडते कलाकार आहात’ असं म्हणून एका काकांनी प्रयोगाच्या ठिकाणी येऊन मला भेटवस्तू दिली. आणि फोटो सहावा, माझ्या काही मित्रांनी मला कपडे घेऊन दिले. मज्जा आली.”

हे देखील वाचा – सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरने खरेदी केली आलिशान कार, म्हणाला, “बायको मला तुझा…”

“मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमचे हे प्रेम असेच वाढत राहो आणि मी आता आणखी जोमाने कामाला लागतो.”, असं म्हणत त्याने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या या पोस्टवर अभिनेत्री स्पृहा जोशी हिने ‘वाह वाह’ अशी कमेंट केली आहे. त्याचबरोबर चाहतेही या पोस्टवर कमेंट करत वाढदिवस आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

Tags: birthday celebrationmarathi actorsankarshan karhadeSankarshan Karhade celebrates his Birthday
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Akshay Mudawadkar Work Profile

'जय जय स्वामी समर्थ' फेम अक्षय मुडावदकर अभिनयक्षेत्रात येण्याआधी 'या' क्षेत्रात करत होता काम, म्हणाला, "मी आठ वर्ष…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.