शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी गुंतवणूक केलेल्या…” २०२३ च्या आठवणीत कुशल बद्रिकेची लक्षवेधी पोस्ट, म्हणाला “मित्रांनी सांगितलं नवीन वर्षात…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 29, 2023 | 1:33 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
chala hawa yeu dya fame marathi actor kushal badrike shared special post in 2023 years memories

"मी गुंतवणूक केलेल्या..." २०२३ च्या आठवणीत कुशल बद्रिकेची लक्षवेधी पोस्ट, म्हणाला "मित्रांनी सांगितलं नवीन वर्षात..."

झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशल हा उत्तम अभिनेता तर आहेच, पण अभिनयाबरोबरच तो एक चांगला लेखकही आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. याचं कारण सोशल मीडियावरील त्याच्या पोस्ट. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो कधी त्याच्या आयुष्यातील दैनंदिन अपडेट देत असतो, तर कधी त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहितीही देत असतो. अशातच त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्याची ही पोस्ट सध्या खूपच चर्चेत आहे. (Kushal Badrike On Instagram)

२०२३ हे वर्ष आता संपायला येत असून येत्या नवीन वर्षांची सर्वांनाच चाहुल लागली आहे. अनेकजण या नवीन वर्षाचे आगमन करत असताना सरत्या वर्षाला निरोप देत आहेत. हा निरोप देत असताना काहीजण त्यांच्या आयुष्यातील घटना, प्रसंगे किंवा अनुभव शेअर करत आहेत. अशातच कुशलने नुकतीच २०२३ या वर्षाला निरोप देतानाची व येत्या नवीन वर्षाच्या आगमनाच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली आहे आणि ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमुळे कुशलही चांगलाच चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

आणखी वाचा – “मायग्रेनचा त्रास होत होता आणि…”, ‘आई कुठे…’मधील अरुंधतीने सांगितला सेटवरील ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “डोकं ठणठणत असतानाही…”

कुशलने स्वत:चा एक फोटो शेअर करत या फोटोखाली एक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने असे म्हटले आहे की, “ह्या सरत्या वर्षाने जाताना बऱ्याच गोष्टी सोबत नेल्या. काही माणसं मनात घर करुन कायमची निघून गेली, त्या रिकाम्या घरांच्या जागा आता कधीच भरुन काढता येणार नाहीत. दरवर्षी प्रमाणे हे वर्षसुद्धा ‘व्याजाचा हप्ता’ जावा तसा माझ्यातला थोडा निरागसपणा घेऊन गेलाच. मी गुंतवणूक  केलेल्या कायमस्वरूपी ठेवीप्रमाणेच माझ्यातही सामंज्यसपणा आला नाही. बहुतेक कुठे गुंतवणूक करावी  आणि कुठे गुंतून जावं हे मला खरच कळत नाही. मित्रांनी सांगितलं आहे, नवीन वर्षात जाताना कोणत्याच भावनांचं ओझं बरोबर घेऊन जाऊ नकोस. म्हणून माझ्यातल्या मलाच थोडा मागे ठेऊन निघालो आहे.”


आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तुझे कुटुंब मला…”, मुन्नवर फारुकी आयेशा खानसह लग्न करण्यास तयार?, म्हणाला “आपण दोघांनी…”

यापुढे त्याने सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देत असे म्हटले आहे की, “येत्या वर्षात व्याज थोडं कमी लागू दे, गुंतवणुकीला मॅच्युरीटी येऊ दे आणि मनातली रिकामी घरं भाडेतत्वावर का होईना, पण जाऊदेत. मनाच्या उंबरठ्यावर पावलांची ये जा रहायला हवी.” त्याच्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्स करत कुशलच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. वा दादा खूपच छान, तुम्ही म्हणालात ते मनाला अगदी भिडलं, एक नंबर, तुझे विचार खूपच छान आहेत.” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.  त्याचबरोबर त्याच्या या पोस्टला लाईक्स व कमेंट्सद्वारे तुफान प्रतिसाद दिला आहे.     

Tags: chala hava yeu dyaentertainment newskushal badrikemarathi actormarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Malaika Arora On Wedding

अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नांनंतर मलायका अरोराही लग्नासाठी तयार, स्वतःचं खुलासा करत म्हणाली, "मी त्याच्याशी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.