छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेमुळे यातील कलाकरांना एक खास ओळख मिळाली आहे. मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने तिच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेमुळे मधुराणी प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. मालिकेतील कलाकार हे नेहमीच पडद्यामागील घटना, प्रसंग किंवा काही दृश्ये प्रेक्षकांबरोबर शेअर करत असतात. अशातच अभिनेत्रीने तिच्या सीनचा एक व्हिडीओ आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. (Madhurani Prabhulkar On Instagram)
मधुराणी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच नुकटींकफह शेअर केलेल्या नवीन व्हिडीओची चर्चा होत आहे. अभिनेत्री यात बाळाला झोपवताना अंगाई गाताना दिसत आहे. हा सीन शूट होतानाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे आणि या पोस्टखाली तिने असं म्हटलं आहे की, “मालिका म्हणजे जवळपास रोजच शूटिंग. आणि त्यात एखादा दिवस म्हणजे परीक्षा असते. मला ह्या गाण्याचं शूट करायचं होतं त्यादिवशी प्रचंड मायग्रेनचा त्रास होत होता. पण काम करणं प्राप्त होतं. सेटवर गेल्यावर मला ‘ही’ (बाळाला झोप का गं येत नाही) अंगाई गायची आहे हे समजलं. सलील (संगीतकार)च्या चाली गायला अवघड असतात.
आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तुझे कुटुंब मला…”, मुन्नवर फारुकी आयेशा खानसह लग्न करण्यास तयार?, म्हणाला “आपण दोघांनी…”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “डोकं ठणठणत असतानाही ती बसवायची आणि लाईव्ह गायची याचं मला अजूनच टेन्शन आलं. पण संदीपच्या शब्दात आणि सलीलच्या चालीत जादू असते. पण जसं मी गाणं गुणगुणायला लागले तसं मला शांत वाटायला लागलं. गाण्यात त्या बाळाला मी थोपटत आहे खरी पण मनात मी स्वतःला जणू जोजवत होते आणि हीच खरी संगीताची जादू असते.”
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओल नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलीच पसंती दर्शवली आहे. अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे या व्हिडीओला तउफफाण प्रतिसाद दिला आहे. “खूप छान, तुझा आवाज खूप गोड आहे, अंगाईची हीच तर जादू आहे. ती बाळाला निजवता निजवता आईला देखील सुखावते, तुम्ही खूपच छान गाता” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी मधुराणीच्या अंगाईचे कौतुक केले आहे.