बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने अलीकडेच सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसह लगीनगाठ बांधली. कुटुंबीय व जवळच्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. अरबाजच्या लग्नानंतर आता त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोराही पुन्हा सात फेरे घेणार असल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने स्वतः ‘झलक दिखला जा ११’ या रिऍलिटी शोमध्ये याबाबतचा इशारा दिला आहे. (Malaika Arora On Wedding)
सध्या मलायका अरोरा सोनी टीव्हीच्या ‘झलक दिखला जा’ सीझन ११ या रिऍलिटी शोमध्ये फराह खान व अर्शद वारसीबरोबर जज म्हणून दिसत आहे. फराह व मलायका अनेकदा शोदरम्यान मस्ती करताना दिसतात. समोर आलेल्या प्रोमोमध्ये, फराहने मलायकाला असे काही विचारले आहे की अभिनेत्री पुन्हा लग्न करण्यास तयार असल्याचं समोर आलं. समोर आलेल्या प्रोमोमध्ये फराह खान मलायकाला विचारते, “तू सिंगल पालक आहेसचं, मात्र २०२४ मध्ये तू अभिनेत्रीबरोबर पुन्हा पालक बनशील का?” मलायका या प्रश्नाने गोंधळून जाते आणि विचारते, “मला पुन्हा कोणालातरी मांडीवर घ्यावं लागेल? याचा नक्की अर्थ काय?” यावर, शोची होस्ट गौहर खान या दोघांमध्ये हस्तक्षेप करते आणि स्पष्ट सांगते, “याचा अर्थ, तु लग्न करणार आहेस का?”.
यावर मलायका लाजत उत्तर देत म्हणते, “जर कोणी असेल तर मी त्याच्याशी १०० टक्के लग्न करेन.” हे ऐकून फराह खान आश्चर्याने म्हणाते, “एक नाही, बरेच आहेत”. यावर मलायका म्हणाते, “जेव्हा मी म्हणते की कोणीतरी आहे, याचा अर्थ कोणी लग्नासाठी विचारले तर मी लग्न करेन”. फराह तिला पुन्हा विचारते, “कोणीही विचारले तर करशील का?” यावर मलायका ‘हो’ असं उत्तर देते. मलायकाच्या या उत्तराने ती लग्नासाठी पूर्णपणे तयार असल्याचे संकेत दिले आहेत.
अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन कपूरने मलायका अरोराच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा ते एकमेकांसह क्वालिटी टाइम घालवताना त्यांचे फोटो शेअर करत राहतात.