काही दिवसांपूर्वी भारतात कोलकाता येथे आरजी रुग्णालयात एका शिकाऊ डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. संपूर्ण देशभरात या घटनेचे पडसाद उमटले. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.तसेच आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणीदेखील करण्यात आली. करीना कपूर, करण जोहर, ऋतिक रोशन, जॉन अब्राहम यांनी कोलकाता प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. अशातच आता सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने महत्तपूर्ण पाऊल उचलले आहे. तिने असे नक्की काय पाऊल उचलले? हे आपण जाणून घेऊया. (Shreya ghoshal on kolkata rape case)
श्रेयाकहा कोलकातामध्ये एक कॉन्सर्ट आयोजित केला होता. मात्र याबद्दल श्रेयाने एक निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयाचे कौतुकदेखील करण्यात येत आहे. श्रेया सोशल मीडियावरुन एक घोषणा केली आहे. यामध्ये तिने कोलकातामध्ये होणारा कॉन्सर्ट रद्द केला असल्याचे सांगितले आहे. तिने लिहिले की, “मी कोलकातामधील कॉन्सर्ट रद्द करत आहे. बलात्कारासारखा भयंकर प्रकार घडला आहे. एक महिला म्हणून तेथील डॉक्टरबरोबर जे चुकीचं कृत्य घडलं त्याबबद्दल विचार करणेदेखील कठीण आहे”.
पुढे तिने लिहिले की, “खूप दु:ख आहे. पण ‘श्रेया घोषाल लाईव्ह’ व प्रोमोटर हा कार्यक्रम इतर दिवशी आयोजित करणार आहेत. तसेच ही घडलेली घटना खूप वाईट आहे. त्या मुलीसाठी आपण उभं राहणं खूप गरजेचं आहे. पण सगळ्यांनी एकत्र येऊन या घटनेचा सामना करावा. या कार्यक्रमाची तारीख बदलण्याचा माझा हेतु माझ्या चाहत्यांना समजेल अशी मी आशा करते, तसेच मी जगातील इतर महिलांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करते. तसेच जर या शोची कोणीही तिकीटं घेतली असतील तर ती तिकीटं नवीन शोसाठीदेखील चालू शकतील”.
दरम्यान श्रेयाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती अनेक भाषांमध्ये गाणी गाताना दिसते. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, उर्दू, अरबी, मल्याळी, बंगाली आशा अनेक भाषामधील तिची गाणी खूप प्रसिद्ध आहेत. शिवाय तिचे सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.