बॉलिवूडमधील अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी अधिक चर्चेत राहिली आहे. २० एप्रिल २००७ साली दोघही लग्नबंधनात अडकले होते. २०१६ साली त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव आराध्या असे ठेवण्यात आले. लग्नाच्या १६ वर्षांनंतर त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या अनेक चर्चा झालेल्या दिसून आल्या आहेत. दोघंही आता घटस्फोट घेणार असे सर्वत्र बोलले जाऊ लागले. परंतु या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे? याबद्दल मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. अशातच आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. (abhishek bachchan and aishwarya rai bachchan fight)
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान अभिषेकने साखरपुड्याची अंगठी दाखवली होती. तसेच त्याने सांगितले होते की, “मी अजूननही विवाहित आहे”, यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला होता. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या व अभिषेक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ऐश्वर्याने अभिषेकबरोबर रोज भांडणं होतात असे सांगितले होते.
ऐश्वर्या व अभिषेक यांनी २०१० साली ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारले होते की, “तुमच्यामध्ये किती वेळा भांडणं होतात?”, त्यावर ऐश्वर्याने उत्तर दिले की, “आमच्यामध्ये रोज भांडणं होतात”, त्यावर अभिषेक म्हणाला की, “पण ती भांडणं नसतात. एखाद्यावेळी आमची मत एक होत नाहीत. ही भांडणं गंभीर स्वरूपाची नसतात. पण आमच्यात अशी भांडणं झाली नाही तर आम्ही कंटाळू”.
त्यानंतर भांडण संपवण्यासाठी अभिषेक स्वतः पुढाकार घेत असल्याचेही सांगितले होते. भांडणं संपवल्याशिवाय झोपायचं नाही असे ऐश्वर्याने नियम घालून दिले आहेत. तसेच खूप झोप येत आहे किंवा झोपायला जायचं आहे या विषयांवरुनच अधिक भांडणं होतात असे अभिषेकने सांगितले होते. तसेच सर्व महिला बेस्ट आहेत आणि त्या नेहमीच बरोबर असतात असेही तो म्हणाला. जमेल तितक्या लवकर पुरुषांनी हे मान्य करावे असे तो म्हणाला होता. दरम्यान अभिषेकच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ‘हाऊसफुल ५’, ‘किंग’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.