Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील गेल्या आठवड्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’मुळे निक्की तांबोळी ‘ए’ टीममधून बाहेर पडली. त्यानंतर तिचं अरबाजबरोबर कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळालं. या भांडणात अरबाजने तोडफोड केली. यामुळे अरबाजला शिक्षादेखील मिळाली. कॅप्टन्सीच्या शर्यतीमधून अरबाजला बाहेर काढण्यात आलं. एवढं सगळं होऊनही आता निक्की-अरबाजमधील वाद काही प्रमाणात निवळल्याचे पाहायला मिळाले. दोघं पुन्हा एकदा एकत्र आल्याचे दिसले. ‘बिग बॉस’च्या कालच्या भागात अरबाज काचेवर हृदय काढतो. मग निक्की बघायला जाते आणि पुन्हा त्या काचेवर इंग्रजीत लिहिते की, भित्र्या अरबाज पटेलबरोबर कायम आहे. त्यानंतर आर्या अरबाजला सल्ला देत म्हणते की, तुला तिच्यापासून दूर व्हायला पाहिजे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात ‘बिग बॉस’ने नेमून दिलेल्या जोडीमुळे आर्या अरबाजबरोबरच्या बंधनात अडकली होती. यावेळी ती अनेकदा अरबाजबरोबर आर्याविरुद्ध बोलत होती. याबद्दल आता रितेशने आर्याला कठोर शब्दांत सुनावले आहे . बिग बॉस मराठीच्या भाऊचा धक्काचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. ज्यात रितेश आर्यावर चांगलाच चिडलेला दिसत आहे. या नवीन प्रोमोमध्ये तो आर्याची चांगलीच शाळा घेत आहे. त्याचबरोबर आर्या केवळ निक्कीमुळेचं या घरात दिसते असं रितेश या नवीन प्रोमोमध्ये तिला म्हणत आहे.
या नवीन प्रोमोमध्ये रितेश आर्याला असं म्हणतो की, “तुमचा खेळ निक्कीशिवाय दिसत नाही” यावर आर्या असं म्हणते की, “निक्की समस्या निर्माण करते आणि आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देतो” यावर रितेश तिला टोकत असं म्हणतो की, “आम्ही नाही फक्त तुम्ही… तुम्ही फक्त स्वत:बद्दल म्हणा” पुढे आर्या असं म्हणते की “निक्की माझा गेम नाहीये”. यावर रितेश तिला असं उत्तर देतो की, “तुम्हाला असं वाटतं की, निक्की तुमचा गेम नाही. आत्ता तुम्ही दिसताय ते फक्त निक्कीमुळेच. त्यामुळे मला इथे सांगू नका तुम्ही कशा दिसताय”
दरम्यान, आजच्या भाऊचा धक्क्यावर रितेश आर्यासह सर्वच सदस्यांची शाळा घेणार असल्याचे दिसून येत आहे. अरबाजचं राग व त्रास खोटा असल्यावरून रितेश अरबाजलाही खडेबोल सुनावणार आहे. तर आर्यालाही तो निक्कीचा गेम म्हणत तिची शाळा घेणार आहे. त्यामुळे आजचा भाऊचा धक्का चांगलाच गाजणार असल्याचे दिसून येत आहे,