Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व प्रचंड चर्चेत असून ‘बिग बॉस’च्या घरातील एका जोडीचीसुद्धा जोरदार चर्चा रंगत आहे. पहिल्या दिवसापासून एकमेकांना साथ देणारे अरबाज-निक्की यांच्यात या आठडव्यात चांगलेच खटके उडाले असल्याचे पाहायला मिळाले. पाचव्या आठवड्याच्या सुरुवातीला नॉमिनेशनच्या टास्कसाठी आणि कॅप्टन्सीसाठी ‘बिग बॉस’ यांनी जोड्या तयार केल्या. त्यामध्ये निक्कीबरोबर अभिजीत असल्यामुळे अरबाजला त्यांची जोडी खटकते. निक्की-अभिजीत यांची मैत्री अरबाजला सहन होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अरबाज-निक्कीतील वाद वाढतच गेला. या वादात अरबाज अनेकदा आक्रमक होत त्याने घरातील वस्तूंची तोडफोडही केली. मात्र शुक्रवारच्या भागात हे दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळाले. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
शुक्रवारी झालेल्या भागात अरबाज व निक्की एकमेकांच्या जवळ आलेले दिसले. अरबाज व निक्की जेव्हा एकत्र बोलायला आले तेव्हा त्यांच्यात जवळीक पाहायला मिळाली आणि दोघांनी एकमेकांची माफी मागत पुन्हा मैत्री केली. अरबाज मध्यरात्री निक्कीच्या कॅप्टन्सी रुममध्येही दिसला. त्यावेळी निक्कीने अरबाजला हे प्रकरण संपवायला संपूर्ण घरासमोर माफी मागायला सांगितली. मात्र अरबाजने उलट तू आधी माफी माग असं सांगितलं. तसंच यावेळी अरबाज व निक्की यांच्यात जवळीकही पाहायला मिळाली आणि यावेळी दोघांनी एकमेकांना मिठीही मारली होती.
यावर आता रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर अरबाज व निक्कीची पोळखोल करणार असल्याचे दिसत आहे. भाऊचा धक्काचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये रितेश असं म्हणतो की प्रेक्षकांना या घरात दोन स्वतंत्र माणसं होती आणि त्यांच्याविरुद्ध दहा जणांची टोळी. या टोळीचे म्होरके होते अरबाज पटेल”. पुढे रितेश अरबाजला असं म्हणतो की, “तुम्हाला आलेला रागही खोटा होतं आणि तुझा त्रास खोटा होता” असं म्हटलं आहे.
तसंच यापुढे रितेश असं म्हणतो की, “सर्वांचे डोळे उघडण्यासाठी मी चक्रव्यूह रुम उघडत आहे”. रितेशच्या या वाक्यानंतर घरातील सर्वच स्पर्धकांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे. तसंच रितेशने चक्रव्यूह खोलीबद्दल बोलताच अभिजीत “आता कान लाल झाला का?” असं म्हणताना दिसत आहे. त्यामुळे आजच्या भागात रितेश भाऊचा धक्कावर सर्वांसमोर अरबाज व निक्कीची चांगलीच शाळा घेणार असल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय अरबाज व निक्की यांची खरी बाजूही तो आज सर्वांसमोर आणणार असल्याचे या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रोमोखाली सर्वांनी अरबाज व निक्कीयांची वागणूक फसवणारी असून आता तरी त्यांचे खरे रंग सर्वांना दिसूदेत” अशा आशयाच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत. A