बिग बॉस १७ चे यंदाचे पर्व घरातील भांडणांमुळे विशेष गाजत आहे. घरातील सदस्य रोजचं कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांशी भांडत असतात. त्यांच्यातील हे वाद कधी घरातील खेळावरून असतात, तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंगावरून असतात. दरम्यान घरातील अंकिता लोखंडे ही घरात गेल्यापासूनच रोजच चर्चेत आहे. कधी ती पती विकी जैनबरोबरच्या भांडणामुळे चर्चेत आली आहे तर कधी तिच्या प्रेग्नन्सीवरुन चर्चेत आली आहे. अशातच ती पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचे कारण आहे मुन्नवर फारूकी बरोबरचे भांडण. (Bigg Boss 17 New Promo)
कलर्स वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यात अंकिता व मुन्नवरमध्ये मन्नाराचे भांडण होत आहे. मुनव्वरची मन्नारा व अंकिता या दोघींशी चांगली मैत्री आहे. पण मन्नारा व अंकिता एकमेकांना आवडत नाहीत. तर मुनव्वरची अंकितापेक्षा आढक मन्नाराबरोबर मैत्री आहे. कदाचित त्यामुळेच अंकिता आता मुनव्वरवर चिडली असल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे.
या प्रोमोमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, अंकिता सनाबरोबर बोलत असते. तेव्हा मुनव्वर त्यांच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. पण अंकिता मुनव्वरला मध्येच अडवते आणि “मुनव्वर, मी बोलत आहे.” असं म्हणते. यानंतर मुनव्वर अंकिताजवळ येतो आणि म्हणतो की “मी काहीतरी बोलत असताना मध्येच अडवलंस?.” यावर अंकिता मुनव्वरला म्हणते, “मला असं वाटत आहे की, मी तुझ्या व मन्नाराच्या मैत्रीच्या मध्ये येत आहे. मी व मन्नारा तुझ्या मैत्रीसाठी एकमेकींबरोबर भांडण करत असल्याची भावना माझ्या मनात येत आहे आणि हे मला नको आहे.”
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून अंकिता व मुनव्वर यांच्यात चांगला बॉण्ड पाहायला मिळाला. अंकिता-मुनव्वर यांची मैत्री त्यांच्या चाहत्यांनाही पसंत पडली. मात्र, आता मन्नारामुळे अंकिता व मुनव्वर यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी भागात हा दुरावा कायम राहणार का? त्यांच्यात टोकाची भांडणं होणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.