शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘ठरलं तर मग’मधील अर्जुनच्या लेकाने बनवली चपाती, आजीबरोबर हातात पोळपाट लाटणं घेऊन करामत, व्हिडीओची जोरदार चर्चा

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 30, 2023 | 4:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Arjun son hridaan make chapatti video

Arjun son hridaan make chapatti video

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने अल्पवधीतच सगळ्यांची मनं जिंकून घेतली. कमी कलावधीतच या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान निर्माण केलं. मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. मालिकेतील अर्जुन सुभेदारच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता अमित भानुशालीने त्याच्या अभिनयातून सगळ्यांनाच आपलंस केलं. त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. अमित सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो नेहमी त्याच्या कामाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यातही तो त्याच्या लेकाबरोबरचे व्हिडीओही शेअर करताना दिसतो. (Arjun son hridaan make chapatti video viral)

या शेअर केलेल्या व्हिडीओतून अमित व त्याच्या लेकाचं सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळतं. याअगोदरही त्याने त्याच्या लेकाबरोबरचे व्हिडीओ शेअर केले होते. त्याच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला होता. आताही अमितने त्याच्या मुलाचा आणखी एक गोड व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो पुन्हा पोळपाट व लाटणं घेऊन बसलेला दिसत आहे.

आणखी वाचा – “माझं सगळं आयुष्य…”, गर्लफ्रेंडची प्रथमेश परबसाठी पोस्ट, वाढदिवसही केला जोरदार सेलिब्रेट, म्हणाली, “तुझ्यासाठी…”

या व्हिडीओत अमितचा लेक हृदान आजीबरोबर म्हणजे अमितच्या आईबरोबर पोळपाट लाटणं घेऊन बसलेला दिसत आहे. तो त्याच्या इवल्याश्या हातांनी पिठाच्या गोळ्याची चपाती लाटताना दिसत आहे. हृदानने अगदी गोल वर्तुळाकार चपाती लाटली आहे. त्याचा हा व्हिडीओ स्टोरीला पोस्ट करत अमितने त्याच्या लेकाचं कौतुक केलं आहे. अमित लिहितो की, “आतापासूनच इतकी परफेक्ट चपाती! आजीबरोबर चपाती बनवताना शेफ हृदान”, असं लिहीत त्याने त्याच्या मुलाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Amit Bhanushali (@aamit.bhanushali)

आणखी वाचा – Video : टी-शर्ट खेचलं, धमकी दिली अन्…; ‘बिग बॉस १७’च्या घरात स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण, वाद विकोपाला, व्हिडीओ व्हायरल

त्याने मागेही हृदानचा पोळपाट-लाटणं घेऊन चपात्या लाटतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केसा होता. तेव्हा त्याने या व्हिडीओला “मास्टरशेफ” असं कॅप्शन देत लेकाचं कौतुक केलं होतं. त्याच्या चाहत्यांनी देखील त्याचं भरभरुन कौतुक केलं होतं. नेटकऱ्यांनाही त्याच्या लेकाच्या करामती पाहायला आवडतात. अमितही त्याच्या लेकाचे विविध व्हिडीओ शेअर करत असतो.

Tags: Aamit bhanushalifame Arjun son hridaanTharla Tar Mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Prithvik Pratap Birthday

३० वर्ष भाड्याच्या घरात राहिला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रताप, स्वकमाईतून द्यायचा तब्बल इतकं रुपये घरभाडं, आता घेतलं आहे स्वतःचं घर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.