मंगळवार, जून 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भर कार्यक्रमात अशोक सराफांनीच बायकोची केली थट्टा, उपस्थितही पोट धरुन हसले, म्हणाले, “किचनमध्ये जाते आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 30, 2023 | 3:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
marathi actor ashok saraf and actress nivedita saraf in colors marathi sur nava dhyas nava show

Video : भर कार्यक्रमात अशोक सराफांनीच बायकोची केली थट्टा, उपस्थितही पोट धरुन हसले, म्हणाले, “किचनमध्ये जाते आणि…”

गेले पाच दशक मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सर्वांचेच लाडके अभिनेते म्हणजे अशोक मामा. वयाच्या पंच्याहत्तरीनंतर देखील आपल्या कामाचे तारुण्य जपत आजही अनेकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या लोभस स्वभावामुळे ते सर्वांनाच आपले वाटतात. अशोक व निवेदिता ही जोडी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होतीच पण त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना आवडते. (Ashok Saraf And Nivedta Saraf In Sur Nava Dhyas Nava Show)

अशोक सराफ व निवेदिता सराफ हे दोघे कलर्स मराठी वरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. नुकताच याचा एक प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये अशोक मामा व निवेदिता सराफ यांचा कॉमेडी अंदाज पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात त्यांच्यात एक खेळ खेळण्यात आला. तेव्हा या खेळादरम्यान झालेली मजामस्ती या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.      

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

आणखी वाचा – “एक डान्सर, एक जोकर”, ऐश्वर्या नारकरांचा नवऱ्यासह भन्नाट डान्स, ट्रोल करणाऱ्याला उत्तर देत म्हणाल्या, “कसं बोलायचं हेच…”

यावेळी कार्यक्रमाची निवेदिका रसिका सुनील मामांना निवेदिता यांच्याबद्दल एक प्रश्न विचारते. रसिका म्हणते, “निवेदिता यांचं सर्वात आवडतं पर्यटन स्थळ कोणतं?” यावर निवेदिता यांच्या हातात दिलेल्या फळ्यावर त्या लंडन असं लिहितात. मात्र अशोक मामा त्यांच्या विनोदीशैलीत उत्तर देत त्यांच्या हातातील फळ्यावर ‘स्वयंपाकघर’ असं लिहितात. त्यांच्या या उत्तरावर परीक्षक, स्पर्धक व उपस्थितांसह सगळेच आश्चर्यचकित होतात आणि मामांनी हे विचित्र उत्तर का दिलं असा विचार करू लागतात.

आणखी वाचा – लहान असताना अशा दिसायच्या ऐश्वर्या नारकर, एका गोष्टीसाठी आई-वडिलांचेही मानले आभार, म्हणाल्या, “त्यांनी माझे…”

इतक्यात आपलं उत्तर कसं योग्य आहे हे सांगताना मामा म्हणतात, “तिचं आवडतं ठिकाण स्वयंपाकघर आहे.  कारण ती तिथे गेली की बाहेरच येत नाही. बाहेर येते आणि पुन्हा आत जाते. त्यामुळे ते एक प्रकारचे पर्यटनस्थळचं झालं ना?” त्यांच्या या उत्तरावर एकच हास्यकल्लोळ होतो. मामांच्या या उत्तरावर निवेदितादेखील हसतात आणि त्यांच्या या विनोदला दाद देतात. दरम्यान या व्हिडीओखाली चाहत्यांनीही कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसेच अशोक व निवेदिता यांच्या नात्यात किती मोकळीक आहे हे दिसून येते आणि त्यांच्या या नात्याची प्रशंसादेखील केली आहे.  

Tags: ashok sarafentertainment newsmarathi actormarathi actressmarathi entertainmentnivedita sarafsur nava dhyas nava
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Sayali Sanjeev On Father

"माझं तुझ्यावर…", बाबांचा हात हातात घेत सायली संजीवने शेअर केली भावुक पोस्ट, कलाकारांनी दिला खचून न जाण्याचा सल्ला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.