गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 6, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anushka sharma troll after banglore stampede

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण...”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने IPL ट्रॉफीवर आपलं नाव कोरत धमाकेदार विजय मिळवला. तब्बल १८ वर्षांनंतर या टीमच्या वाट्याला हा क्षण आला. विराट कोहली तर १८ वर्ष सातत्याने एकाच टीमसह एकनिष्ट राहिला. अखेरीस त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं. देशभरातील आरसीबीच्या चाहत्यांनी विजयानंतर एकच जल्लोष केला. बंगळूरसह कर्नाटकमध्ये तर क्रिकेटप्रेमींच्या आनंदाला परीसीमाच नव्हती. पण या आनंदाला, उत्साहाला गालबोट लागलं. ४ जूनला आरसीबी टीम बंगळूरमध्ये गेली. दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर अनुष्का शर्मा चांगलीच ट्रोल होत आहे. (Anushka sharma troll after banglore stampede)

बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कर्नाटक सरकारद्वारे आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी स्टेडियमबाहेर हजारो क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. मात्र या गर्दीचे स्वरुन चेंगराचेंगरीने घेतले. यामध्ये अनेक जखमी झाले तर ११ जणांचा मृत्यू झाला. याचसंदर्भात अनुष्काने एक पोस्ट शेअर केली. मात्र ही पोस्ट शेअर करताच तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनुष्काला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे.

आणखी वाचा – बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं…”

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्का म्हणाली की, “चेंगराचेंगरीत झालेल्या नुकसानाबाबत आरसीबी दुःख व्यक्त करत आहे. तसेच या घटनेमुळे ज्या कुटुंबियांचं नुकसान झालं त्याची आम्हाला जाणीव आहे. परिस्थिती नक्की काय आहे? हे समजताच आम्ही कार्यक्रम थांबवला. स्थानिक प्रशासनाशी संवाद साधला. तसेच त्यांनी दिलेल्या गाइडलाइन्सनुसार पुढे आम्ही सगळं फॉलो करत गेलो”. तिच्या याच पोस्टवर अनेकांनी संतापजनक कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – “कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

कोट्यवधी रुपये कमावले पण ज्यांचा जीव गेला त्यांच्या कुटुंबियांना मदत तरी करायची, आरसीबीने चेंगराचेंगरीत नुकसान झालेल्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहिर का केली नाही?, या लोकांना तुम्ही किती पैसे दान करणार?, उगाच लोकांची सहानुभूती मिळवू नको, तू ड्रामा क्वीन आहेस, तुझं खोटं रडणं आम्हाला नको अशा विविध कमेंट अनुष्काच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. आता खरंच विराट किंवा आरसीबी टीम नुकसान झालेल्यांना मदत करणार का? हे पाहावं लागेल.

Tags: anushka sharmabollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Next Post
Who Is Hina Khan Husband

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.