मंगळवार, जून 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझं तुझ्यावर…”, बाबांचा हात हातात घेत सायली संजीवने शेअर केली भावुक पोस्ट, कलाकारांनी दिला खचून न जाण्याचा सल्ला

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 30, 2023 | 4:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sayali Sanjeev On Father

"माझं तुझ्यावर...", बाबांचा हात हातात घेत सायली संजीवने शेअर केली भावुक पोस्ट, कलाकारांनी दिला खचून न जाण्याचा सल्ला

अभिनेत्री सायली संजीव एका चित्रपटामुळे विशेष चर्चेत आली आहे. सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात सायली महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. सायलीच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवलेला पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सायली सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. (Sayali Sanjeev On Father)

‘झिम्मा २’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असणारी सायली एका व्यक्तीच्या आठवणीत मात्र खूप भावुक झाली आहे. ही व्यक्ती म्हणजे तिचे बाबा. अभिनेत्रीच्या वडिलांचे दोनवर्षापूर्वी ३० नोव्हेंबर रोजी निधन झाले. सायलीच्या वडिलांना जाऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र सायलीच्या मनातील दु:ख आजही ताजं आहे. तिने तिच्या लाडक्या बाबासाठी सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “एक डान्सर, एक जोकर”, ऐश्वर्या नारकरांचा नवऱ्यासह भन्नाट डान्स, ट्रोल करणाऱ्याला उत्तर देत म्हणाल्या, “कसं बोलायचं हेच…”

सायलीने तिच्या लाडक्या बाबाचा हातात हात घेतलेला फोटो शेअर केला आहे. या पोस्टला तिने “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बाबा’ असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सायलीला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेता समीर चौघुलेने सायलीच्या या पोस्टवर कमेंट करत, “खूप प्रेम सायली, ते तुझ्याबरोबर कायम आहेत” असं म्हणत तिला धीर दिला आहे. सायलीच्या या भावुक करणाऱ्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिला खंबीर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तुझे वडील कायम तुझ्याबरोबर आहेत अशा कमेंटही केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

आणखी वाचा – “काय कमाल आहे ना बायकांची…”, अभिनेत्रींचे फोटो शेअर करत सिद्धार्थ चांदेकरचं वक्तव्य, म्हणाला, “संकटाच्या, दुःखाच्या काळात…”

अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांचे निधन दोन वर्षांपूर्वी कर्करोगाशी सामना करताना झाले. वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी सायलीने तिच्या बाबांचं नाव असणारी गोधडीही शिवून घेतली आहे. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या बाबांसाठी खास टॅटूही गोंदवून घेतला आहे. सायली व तिच्या वडिलांचं घट्ट बॉण्डिंग होतं. नेहमीच ती तिच्या लाडक्या बाबासाठी काही ना काही पोस्ट शेअर करत असते.

Tags: jhimma 2marathi actresssayali sanjeevsayali sanjeev emotionalsayali sanjeev father
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
bigg boss 17 new promo ankita lokhande and munawar faruqui fight because of mannara chopra

Bigg Boss 17 : "मन्नारा व तुझ्यामध्ये…", अंकिता लोखंडे व मुनव्वर फारुकीमध्ये वादाची ठिणगी, अभिनेत्रीने काढला राग, म्हणाली, "माझ्या मनात आता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.