शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “तुझे कुटुंब मला…”, मुन्नवर फारुकी आयेशा खानसह लग्न करण्यास तयार?, म्हणाला “आपण दोघांनी…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 29, 2023 | 11:33 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bigg boss 17 munawar faruqui asks to ayesha khan will your family accept me video viral on social media

“तुझे कुटुंब मला...”, मुन्नवर फारुकी आयेशा खानसह लग्न करण्यास तयार?, म्हणाला “आपण दोघांनी...”

‘बिग बॉस १७’ हा शो गेले अनेक दिवस चर्चेत आहे. शोमध्ये येणारे नवीन स्पर्धक या शोला आणखीनच रंजक बनवत आहेत. या शोमध्ये येणारे नवीन ट्विस्ट हा या शोचे आकर्षण ठरत आहे. अशातच आता या शोमध्ये नुकतीच आयेशा खानची एण्ट्री झाली आहे. तिच्या एण्ट्रीने या घरातील समीकरणेच बदलली असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी मुन्नवरने आयेशाबरोबर लग्नाच्या शक्यतेवर संवाद साधताना दिसला. यावेळी मुन्नवरने आयेशाला मुनवरने आयेशाल तिच्याबरोबर लग्न करण्याच्या शक्यतेबद्दल विचारले.

मुन्नवरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये मुन्नवर आयेशाबरोबर लग्नाबद्दल चर्चा करताना दिसत आहे. यावेळी तो तिला असं विचारतो की, “आपण दोघांनी जर आपल्यातले प्रश्न सोडवले आणि भविष्यात आपल्यात काही चांगले घडणार असेल तर तुझे कुटुंब मला स्वीकारेल का?” मुनव्वरचे हे शब्द ऐकून आयेशा खुश होते आणि त्याला विचारते की, “तुला खरच आपल्यातल्या गोष्टी सुधारायच्या आहेत का?” यावर मुन्नवर उत्तर देत असे म्हणतो की, “माझी मनापासून इच्छा आहे.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – ‘रमा राघव’ फेम अभिनेत्री सोनल पवारचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार, डिझायनर लेहेंग्यामध्ये खुललं सौंदर्य, रिसेप्शन लूकचे फोटो समोर

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत मुन्नवरवर नाराजी व्यक्त केली आहे. “मुन्नवर तु इतक्या लवकर नाझिलाला कसं विसरू शकतोस?, आयेशा जेव्हा वाईल्ड कार्ड म्हणून आली तेव्हा तो म्हणत होता की तो नाझिलाला खूप मिस करत आहे आणि आयेशाबरोबर राहण्याची इच्छा व्यक्त करत आहे?, हे खूपच चुकीचे आहे. मुन्नवर तु आमच्या मनातून उतरत आहेस” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी व नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “मैत्री झाली, प्रेम झालं आता…”, सुरुची अडारकरचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, व्हिडीओमध्ये दिसली लग्नाची संपूर्ण झलक

दरम्यान, आयेशाने घरात एण्ट्री करताच तीने मुन्नवरचा बदला घेणार असल्याचे म्हटले होते. आयेशा मुन्नवरचा पर्दाफाश करणार असल्याचे बोलली होती. तर मुन्नवरदेखील त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला नाझिलाची आठवण येत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र आता दोघांमधील संघर्ष कमी होऊन त्यांच्यात प्रेम फुलत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी भागात काय पहायला मिळणार याचे अनेकजण वाट पाहत आहेत.       

Tags: ayesha khanbigg bossbigg boss 17entertainmententertainment newsmunawar farooqui
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
aai kuthe kay karte fame marathi actress madhurani prabhulkar shared video from set

“मायग्रेनचा त्रास होत होता आणि…”, ‘आई कुठे...'मधील अरुंधतीने सांगितला सेटवरील 'तो' प्रसंग, म्हणाली, “डोकं ठणठणत असतानाही…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.