‘का रे दुरावा’ फेम अभिनेत्री सुरुची अडारकार व अभिनेता पियुष रानडे या कलाकार जोडीने काही दिवसांपूर्वी गुपचूप लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. सुरुची-पियुष यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच साऱ्यांना त्यांच्या लग्नाविषयी माहीत झाले. सुरुचीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे “आनंदाचा दिवस” म्हणत त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये दोघांचा पारंपरिक लूक पाहायला मिळाला होता. दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच सुरुचीने नुकताच एक नवीन व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. (Suruchi Adarkar On Instagram)
सुरुचीने खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सुरुचीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नाची झलक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या नवीन व्हिडीओमध्ये सुरुचीने पियुषसाठी खास उखाणाही घेतला आहे. “आयुष्याच्या वळणावर अवचित झाली भेट, मैत्री झाली, प्रेम झाले, आता लग्न थेट, सुखी संसार व्हावा हीच प्रार्थना देवाचरणी, पियुष रावांचं नाव घेते भरभरून आशीर्वाद द्या सर्वांनी” असं म्हणत तिने पियुषसाठी खास उखाणा घेतला. तसेच या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नाचे काही खास क्षणदेखील पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नाचे काही खास क्षण दाखवण्यात आले असून या दोघेही अत्यंत आनंदी दिसत आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये सप्तपदी घेतानाचे, मंगळसूत्र घालतानाचे काही खास क्षण दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये सुरुची-पियुष यांच्या लग्नातील प्रत्येक लूक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये दोघांनी त्यांच्या लग्नातील अनुभवाविषयीदेखील सांगितले आहे. पियुषने हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असल्याचे सांगितले. तसेच हा खास क्षण आम्ही आनंदाने साजरा करत असल्याचेही त्याने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
सुरुची-पियुष यांचा लग्नसोहळा त्यांचे जवळचे मित्रपरिवार, कुटुंबीय व काही नातेवाईकांसह मोठ्या थाटामाटात पार पडला. दरम्यान, सुरुचीने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट्सद्वारे त्यांना त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत. तसेच “खूप छान, खूप गोड दिसत आहात, शुभेच्छा, अभिनंदन” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.