मनोरंजनविश्वात सध्या सगळीकडेच लगीनघाई पाहायला मिळत आहे. मुग्धा-प्रथमेश, स्वानंदी-आशिष, गौतमी-स्वानंद यांच्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री मानसी घाटे हीदेखील विवाहबंधनात अडकली. अशातच आता छोट्या पडद्यावरील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. झी मराठी वरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सोनल पवार ही नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. काल (२८ डिसेंबर) रोजी या अभिनेत्रीचा विवाहसोहळा पार पडला. (Sonal Pawar On Instagram)
सोनलने पती समीर पौलास्तेबरोबर लग्नगाठ बांधली. सोनलने लग्नात जांभळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. त्यावर अस्सल मराठमोळे दागिने परिधान केली आहेत. केसांच्या खोप्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर तिच्या ब्लाउजवरील मोरपीस अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. वधूच्या वेशात सोनल खूप सुंदर दिसत आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटो व व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अशातच आता त्यांच्या रिसेप्शन लूकचेही काही फोटो सोशल मीडियावर आले आहेत. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हे खास फोटो शेअर केले आहेत.
सोनलने लग्नासाठी खास लूक केला होता. या लूकसाठी तिने ऑफ व्हाईट रंगाचा मोठा लेहेंगा परिधान केला आहे आणि त्यावर लाल रंगाचा शेलादेखील घेतला आहे. तर समीरनेही तिच्या लूकला साजेसा असा कुर्ता व त्यावर खास फेटा परिधान केला होता. दोघेही लग्नाच्या या खास लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. सोनलने शेअर केलेल्या फोटोखाली “मिस्टर अँड मिसेस पौलास्ते” असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत. गेले काही दिवस त्यांच्या साखरपुडा व हळदीचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत होते. अशातच आता त्यांचं शुभविवाहदेखील पार पडला आहे. त्यामुळे चाहत्यांना आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, सोनालने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे, अदिती द्रविड, अक्षया गुरव, सई रानडे यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तर त्यांच्या अनेक चाहत्यांनीदेखील “अभिनंदन, शुभेच्छा, खुप छान दिसत आहात, खूपच गोड” अशा अनेक कमेंट्स करत त्यांचे अभिनंदन केले आहे.