Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ दररोज नवनवीन भांडण पाहायला मिळतात. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विकी जैन व अभिषेक कुमार यांच्यातील जोरदार वादाच्या वेळी, अंकिताचा नवरा विकी जैनचा राग अनावर झाला. अभिषेक व विकी यांच्यात खाण्याच्या पदार्थावरून जोरदार वाद सुरू होता, पण त्याच दरम्यान अंकिता लोखंडेने त्यांच्या भांडणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. अंकिता भांडणाच्या मध्ये बोलल्याचं विकीला सहन झालं नाही. दरम्यान त्याने तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला.
विकीच्या या विक्षिप्त वागण्याने अंकिताही अवाक झाली. ‘बिग बॉस’च्या घरातील इतर स्पर्धक ही त्याचे हे रूप पाहून आश्चर्यचकित झाले. विकीची कृती पाहून अरुण ‘आज मी काय पाहिलं?’ असं म्हणताना दिसला. यावर आता विकीने भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. विकीने हे प्रकरण सांभाळत अंकिताला कानाखाली मारण्याचा प्रयत्न करत नव्हतो असं म्हणाला. तो म्हणाला की मी तिचं ब्लॅंकेट खेचत होतो. दरम्यान यावेळी अंकिताही पतीपासून बचाव करताना दिसली.
अंकिता व विकी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एकाने लिहिले की, “विक्की भैया आपल्या पत्नीबरोबर चारचौघात कसा वागत आहे”, आणखी एक म्हणाला, “अंकितालाही माहित होते की काय होणार आहे, पण नातेसंबंधामुळे अंकिता गप्प राहिली”. याशिवाय इतर लोकांनीही कमेंट्सद्वारे नाराजी व्यक्त केली.
‘बिग बॉस’च्या घरात विकी व अंकिता यांच्यात अनेकदा भांडणे पाहायला मिळाली. दोघांमध्ये कितीही भांडण झाले तरी काही वेळातच ते सर्व विसरून नॉर्मल होतात. अंकिताने रागाच्या भरात विकीपासून घटस्फोट मागितल्याचीही चर्चा होती. याशिवाय याआधीही अंकिताने रागाच्या भरात तिच्यावर चप्पल फेकून मारली होती.