बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा ब्लॉकबस्टर चित्रपट डंकी २१ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ‘जवान’ व ‘पठाण’च्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुखचा डंकी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना याला तोडीस तोड देण्यास प्रभासचा सालार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दोन बिग बजेट सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झालेली पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई आणि कोणत्या चित्रपटाने बाजी मारली ते पाहूया. (salaar and dunki movie Box Office Collection)
Sacnilk.com च्या मते, शुक्रवार, २२ डिसेंबर रोजी, डंकी देशभरात ३१.२२% हिंदी मध्ये पाहिला गेला, भारतात त्याचे एकूण नेट कलेक्शन ४९.२० कोटी रुपये झाले. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी २० कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा सर्वाधिक मुंबईत ४६% पाहिला गेला. तर चेन्नई ४०% पाहिला गेला. कोलकाता ३८.७५% दिल्लीत ३३% पाहिला गेला. रात्रीच्या शोमध्ये सर्वाधिक लोकांची व्याप्ती नोंदवली गेली. पहिल्या दिवशी कोलकातामध्ये डंकी सर्वाधिक पाहिला गेल्याची नोंद झाली. कोलकातामध्ये एकूण ५५.२५% दिसून आले.
Sacnilk.com च्या मते, ‘सालार’ या चित्रपटाने भारतात ऑनलाइन बुकिंगमध्ये ४२ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही विक्रीचा विचार करताना, सर्व भाषांमध्ये एकूण सुरुवातीच्या दिवसाची कमाई सुमारे १८० कोटी असणे अपेक्षित आहे. एकूणच दोन्ही चित्रपटांमध्ये तसे पाहता प्रभासच्या ‘सालार’मुळे शाहरुखचा ‘डंकी’ थोडासा मागे पडलेला दिसत आहे.
आणखी वाचा – आमचं झालंय! मुग्धा-प्रथमेशची लग्नानंतरची पहिली पोस्ट चर्चेत, पारंपरिक लूक ठरतोय लक्षवेधी
राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘डंकी’ या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली असली तरी दुसऱ्या दिवशी त्याच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली. तर प्रशांत निल दिग्दर्शित ‘सालार’ हा चित्रपट पहिल्या दिवशी बक्कळ कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे.