गेले काही दिवस हिंदी व मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. मराठीतील अमृता-प्रसाद व सुरूची-पियुष या जोड्यांनंतर नुकतंच गायिका मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचाही विवाहसोहळा पार पडला. तर लवकरच स्वानंदी व आशिष हे दोघेही लग्न करणार असल्याच्या अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. अशातच आता छोट्या पडद्यावरील आणखी एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. (Manasi Ghate On Instagram)
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेतील एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. हे अभिनेत्री म्हणजे मानसी घाटे. मालिकेत दिपाच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री लवकरच लग्नाबंधनात अडकणार आहे. मानसीच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून तिने सोशल मीडियावर याचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या ग्रहमखाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिची आई व बहीण तिला सजवताना दिससात आहेत. “ग्रहमखाने सुरू झाला विवाह मंडपाकडे सौभाग्यकांक्षिणीचा प्रवास” असं म्हणत मानसीने हे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून तिच्या चेहऱ्यावर हास्य खुलले आहे. या फोटोंवर अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘डंकी’ व प्रभासच्या ‘सालार’चं ऑनलाइन लिकमुळे मोठं नुकसान, निर्मात्यांना बसणार मोठा फटका
दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत मानसीने दिपाच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिचे नाव साक्षी असं असून दिपा व साक्षी या खूप चांगल्या मैत्रीणी दाखवण्यात आल्या होत्या. त्यांचा हा खास बॉण्ड प्रेक्षकांनाही चांगलाच भावला होता.