कलर्स वाहिनीवरील सलमान खानचा बहुचर्चित कार्यक्रम ‘बिग बॉस १७’ जसजसा पुढे जात आहे, तसतसे स्पर्धकांमधील मतभेद आणि भांडणेही सातत्याने वाढत आहेत. ‘बिग बॉस १७’ मध्ये ऐश्वर्या शर्मा तिच्या दमदार लुक आणि सततच्या भांडणामुळे कायमच चर्चेत राहते. ‘बिग बॉस’मध्ये ऐश्वर्या शर्मा, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात सततची भांडणं होत असतात. नुकतंच ऐश्वर्याचं तिच्या नवऱ्याबरोबर भांडणाचा व्हिडीओ व्हयरल झाला होता. अशातच आता या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या अभिषेक कुमारबरोबर भांडताना दिसत आहे. (bigg boss 17 update)
या व्हिडीओमध्ये अभिषेक-ऐश्वर्या यांच्यात स्वयंपाकघरातील कामावरून भांडण झाल्याचे दिसत आहे आणि ऐश्वर्या रागाने अभिषेकला शिवीगाळ देखील करत आहे. या प्रोमोमध्ये “ऐश्वर्या इतरांइतके काम करत नाही.” असं अभिषेक म्हणताना दिसतो. अभिषेकचे हे बोलणं ऐकून ऐश्वर्याला खूप राग येतो आणि ती अभिषेकवर रागाने ओरडू लागते. यादरम्यान नील भट्ट ऐश्वर्याला रोखण्याचा खूप प्रयत्न करतो. पण ती नीलचं ही ऐकत नाही.
अभिषेकबरोबरच्या भांडणात ऐश्वर्या अंकिताला टोमणा मारते की, “मी कोणाला चाटत नाही”. जे ऐकून अंकिता चिडते. यानंतर अंकिता अभिषेक-ऐश्वर्या यांच्या भांडणामध्ये पडते आणि यावर “इथे कुणीही कुणाला चाटत नाही” असं अंकिता उत्तर देते. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या अंकिताला कधी वेडी तर कधी पागल बोलताना दिसत आहे.
दरम्यान, बिग बॉसचा हा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्या शर्मा, अभिषेक कुमार व अंकिता लोखंडे यांच्या या व्हिडिओवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत “ऐश्वर्या खरंच चुडेल आहे”. असं म्हटलं आहे, तर एकाने “ऐश्वर्या ओव्हरऍक्टिंगचं दुकान आहे”. असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.