शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांच्या शेवटच्या दिवसांत…”, वडिलांच्या निधनाला तीन वर्षे होताच ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री भावुक, म्हणाली, “असा बापमाणूस…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 18, 2024 | 11:07 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte fame Ashwini Mahangde shared an emotional post for her father.

“त्यांच्या शेवटच्या दिवसांत...”, वडिलांच्या निधनाला तीन वर्षे होताच 'आई कुठे...' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री भावुक, म्हणाली, "असा बापमाणूस..."

कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांना त्यांच्या प्रियजनांना गमावण्याची वेळ आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्यावरही असाच एक दुःखद प्रसंग ओढावला होता. कोरोनाशी झुंज देताना अश्विनीचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे निधन झाले होते. “कोरोनाने घात केला, माझा आधारवड हरपला” अशा शब्दात अश्विनीने फेसबुकवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती.

यानंतर वेळोवेळी अभिनेत्रीने तिच्या वडिलांविषयीची आठवण व्यक्त केली असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. अशातच आज अश्विनीच्या वडिलांचे निधन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने पुन्हा एकदा अश्विनीने तिच्या वडिलांची आठवण काढत त्यांच्याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. अश्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे वडिलांचा एक फोटो शेअर केला असून या फोटोसह तिने वडिलांविषयी आठवणही काढली आहे.

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’ फेम बेपत्ता गुरुचरण सिंग तब्बल २५ दिवसांनी परतला, नेमका कुठे आणि का गेला होता?, स्वतःच केला खुलासा, म्हणाला…

अश्विनीने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “बघता बघता ३ वर्ष निघून गेली त्यांच्याशिवाय. बरेच आनंदाचे क्षण, दुःख, घेतलेल्या वस्तू, माझे पहिले घर हा सगळा प्रवास त्यांच्याशिवाय करावा लागला. पण या सगळ्यात माझ्या विचारात आणि माझ्यात ते कायम आहेत आणि यापुढेही राहतील. असा बापमाणूस मिळायला भाग्य लागतं. त्यांच्या शेवटच्या काही दिवसांत त्यांनी आमच्यासाठी पाहिलेली स्वप्न मला सांगितली आणि ती मी नक्की पूर्ण करेन”.

आणखी वाचा – शनिवारी मेष व तूळ राशीच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा, तर वृषभ राशीच्या लोकांचीही होणार स्वप्नपूर्ती, जाणून घ्या…

वडिलांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणदिनानिमित्त अश्विनीने ही पोस्ट शेअर केली असून तिच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टखाली अभिनेत्रीच्या वडिलांना आदरांजली वाहिली आहे. दरम्यान, अश्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.

Tags: aai kuthe kay kartemarathi entertainment newsMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Rakhi Sawant On Health

"ऑपरेशन थिएटरमध्ये जात आहे आणि…", राखी सावंतने रुग्णालयामधून शेअर केला व्हिडीओ, रडत म्हणाली, "प्रार्थना करा कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.