टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ हा आल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या शोमधील लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे व विकी जैन हे तर या शोमुळे आणखीनच प्रसिद्ध झाले आहेत. या जोडीमधील भांडणं ही प्रेक्षकांसाठी काही नवीन राहिली नाहीत. या जोडीमध्ये अनेकदा भांडणे झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. अशातच गेले काही दिवस विकी व अंकिता यांच्यात मन्नारावरुन मतभेद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अंकिताला मन्नारा व विकी यांच्या मैत्रीमुळे विकीबद्दल असुरक्षितता वाटत असल्याचे दिसून येत आहे.
अशातच या शोमध्ये येत्या वीकेण्ड का वारमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एकदा अंकिता व विकीची आई येणार आहे आणि यावेळी विकीच्या आईने केलेल्या एका कृतीमुळे अंकिता तिच्या सासूवर नाराज झाली अस्लयचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात अंकिताने विकीला लाथ मारल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. यावर सोशल मीडियावर अनेकांकडून अनेक प्रकाराच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. यावरच आता विकीच्या आईने तिची प्रतिक्रिया दिल्यानंतर अभिनेत्री आपल्या सासूबाईवर नाराज झाली आहे.
Just 3 month before her dad passed away and it's so disgusting to hear such comments from his mom!
— ???????????????????????????? ???????????????????? ???????? ???? (@RashamiDesaiFC_) January 8, 2024
it's so sad to see that in last phase of game she's going through such situations! stay strong babe ????#AnkitaLokhande #BB17 #AnkitaIsTheBoss #BiggBoss17 pic.twitter.com/yQ04CeWH9h
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये अंकिताने विकीला लाथ मारल्याबद्दल विकीच्या आईने निराशा व्यक्त केली. या व्हिडीओमध्ये विकीची आई अंकिताला असे म्हणते की, “ज्या दिवशी तू विकीला लाथ मारलीस, मी लगेच तुझ्या आईला फोन केला. मी तिला विचारले की, “तुझ्या पतीशीही तुम्ही असेच वागत होता का? तुम्हीदेखील तुमच्या पतीला अशीच लाथ मारत होतात का?” आणि हे ऐकताच अंकिताने यावर नाराजी व्यक्त केली.
आणखी वाचा – बॉलिवूडमध्ये लगीनघाई! आयरा-नुपूर नंतर ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्रीदेखील अडकणार विवाहबंधनात, तारीखही आली समोर अन्…
यावर अंकिताने सासूला प्रतिउत्तर देत असे म्हटले की, “माझ्या आईला फोन करायची काय गरज होती? माझ्या वडिलांचे निधन झाले आहे आणि अशा गोष्टीत तुम्ही आई-वडीलांना कृपया आणू नका.” विकीच्या आईच्या या वागणुकीमुळे अंकिता तिच्या सासूवर चांगलीच नाराज झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अंकिताच्या वडिलांचे तिने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी ऑगस्टमध्ये निधन झाले होते.